सोशल मीडियावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या ट्विटचा म्हणून एक ट्विटचा स्क्रिनशॉट (Raj Thackeray tweet on Kangana) व्हायरल होतोय. स्क्रिनशॉटमधील वक्तव्यामध्ये अभिनेत्री कंगना राणावत हिला पाठिंबा देतानाच अभिनेत्री करीना कपूर हिच्यावर टीका करण्यात आली आहे.
‘कंगना जैसी बहादुर औरतें मिलती तो बाबर आगे न बढ़ पाता लेकिन अफ़सोस करीना जैसी ज्यादा मिली जो घुटने टेक के तैमूर पैदा करती रही’ असा मजकूर असणारा हा स्क्रिनशॉट राज ठाकरेंनी कंगना राणावतला आपला पाठिंबा जाहीर केल्याच्या दाव्यासाठी जातोय.
पडताळणी:
सर्वप्रथम तर आम्ही राज ठाकरे यांनी कंगना राणावतच्या प्रकरणावर नेमकी काय प्रतिक्रिया दिलीये हे बघण्यासाठी राज ठाकरेंच्या अधिकृत ट्विटर अकाउंटला भेट दिली. गेल्या काही दिवसांमध्ये राज ठाकरेंनी कंगना प्रकरणावर कुठलेही भाष्य केले असल्याचे आम्हाला आढळून आले नाही.
राज ठाकरे यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटचे हॅण्डल आहे @Rajthackerey आणि सध्या व्हायरल होत असलेल्या स्क्रिनशॉटमधील ट्विट करण्यात आलेले आहे @iRajthackerey या हॅण्डलवरून.
ट्विटरकडून जवळपास सर्वच सेलिब्रिटींची अकाउंट ‘ब्लू टिक’ने व्हेरिफाय केली जातात. मात्र व्हायरल ट्विट ज्या हॅण्डलवरून करण्यात आले आहे, त्यावर कुठलाही व्हेरिफिकेशन मार्क नाही.
आम्ही @iRajthackerey हे ट्विटर हॅण्डल शोधण्याचा प्रयत्न केला असता असे आढळून आले की हे ट्विटर अकाउंट अस्तित्वातच नसल्याचे सांगण्यात येत आहे. म्हणजेच हे अकाउंट डिलीट करण्यात आलं आहे.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत हिच्या समर्थनात आणि करीना कापुरवर टीका करणारे ट्विट (Raj Thackeray tweet on Kangana) केलेले नाही. सोशल मीडियावर व्हायरल ट्विट फेक अकाऊंटवरून करण्यात आले असून हे अकाउंट सध्या अस्तित्वातच नाही.
हेही वाचा- शाहरुख खानने एमआयएम पक्षाला मतदान करण्याचे आवाहन केल्याचा दावा करणारा फोटो एडिटेड!
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती ‘ चेकपोस्ट मराठी’च्या 9172011480 या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
[…] हेही वाचा: राज ठाकरेंच्या फेक ट्विटर हॅण्डलवरून… […]