Press "Enter" to skip to content

रेल्वे खात्यात वेल्डर पासून कनिष्ठ सहाय्यक पदांच्या ५२८५ जागांवर भरतीची जाहिरात फेक!

कोरोनामूळे देशातील बेरोजगारांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असताना रेल्वे खात्यातील रिक्त जागांसाठी अर्ज मागवण्यात येत असल्याची जाहिरात प्रकाशित झालीय. (railway recruitment ad)

वेल्डर पासून कनिष्ठ सहाय्यक, नियंत्रक, बुकिंग क्लार्क अशा एकूण ८ पदांसाठी तब्बल ५२८५ रिक्त जागांसाठी भरती होणार असल्याची एक जाहिरात ८ ऑगस्टच्या दैनिक जागरण मध्ये प्रसिद्ध करण्यात आली. सदरील जाहिरातीचे कात्रण सोशल मीडियावर लोक एकमेकांना पाठवत आहेत. (railway recruitment ad)

Advertisement
published ad to tell railway recruitment
Source: Twitter

पडताळणी:

बेरोजगारीचा वाढता क्रम पाहता अशा जाहिरातींमधून अनेक तरुणांची फसवणूक होण्याची शक्यता असते. तेव्हा व्हायरल होणाऱ्या जाहिरातीचे सत्य जाणण्यासाठी ‘चेकपोस्ट मराठी’ने पडताळणी करण्यास सुरुवात केली.

रेल्वे खात्याविषयी अधिकृत माहिती मिळवण्याचा मार्ग म्हणून आम्ही रेल्वे मंत्रालयाचे अधिकृत ट्विटर अकाऊंट तपासले. तेव्हा व्हायरल होणारी जाहिरात (railway recruitment ad) आणि त्यावर खुलासा करणारे ट्विट दिसून आले.

रेल्वे मंत्रालयाचे ट्विट :
व्हायरल होणारी जाहिरात आणि त्यावर तथ्य मांडणाऱ्या बातमीचा पुरावा देत सदरील जाहिरात फसवी असल्याचा खुलासा रेल्वे मंत्रालयाने केला.

रेल्वे मंत्रालयाने ट्विटरवर शेअर केलेल्या बातमीनुसार अवेस्ट्रान इन्फोटेक नावाच्या आउटसोर्सिंग कंपनीने कनिष्ठ सहाय्यक ६००, नियंत्रक ३५, बुकिंग क्लार्क ४३०, गेटमन १,२००, कॅन्टीन सुपरव्हायझर ३५०, प्यून १,४६०, कॅबिनमन ७८० आणि वेल्डर ४३० अशा आठ जागांच्या एकूण ५,२८५ रिक्त जागांसाठी रेल्वे खात्यात भरती होणार असल्याचे जाहीर केलंय.

तसेच १० सप्टेंबर २०२० अखेरपर्यंत www.avestran.in या वेबसाईटवर अर्जदारांना ७५० रुपये ऑनलाईन भरण्यास सांगितले आहेत.

सदरील जाहिरातीवर स्पष्टीकरण देत पूर्व मध्य रेल्वे विभागाचे मुख्य जनसंपर्क अधिकारी (सीपीआरओ) राजेश कुमार यांनी ही जाहिरात म्हणजे फसवेगिरीचा प्रकार असून रेल्वे विभागाद्वारे अशी कोणतीही जाहिरात प्रसिद्ध केली नसल्याचे सांगितले. तसेच रेल्वे खात्यात बाहेरील माध्यमाद्वारे भरती केली जात नाही आणि या फसव्या जाहिरातीसंबंधी रेल्वे विभाग चौकशी करत असल्याचे सांगितले.

वस्तुस्थिती:

चेकपोस्ट मराठी‘ने केलेल्या पडताळणीत आढळून आलेल्या रेल्वे मंत्रालयाने ट्विटर द्वारे दिलेल्या माहितीनुसार सदरील जाहिरात फसवी असल्याचे स्पष्ट झाले. रेल्वे खात्यात होणारी भरती ही कोणत्याही इतर बाह्य माध्यमाद्वारे होत नसल्याचे देखील समोर आले.

त्यामुळे अशा कुठल्याही जाहिरातींवर विश्वास ठेवण्या आधी किंवा पैसे देऊन बसण्यापूर्वी ‘चेकपोस्ट मराठी’च्या ९१७२०११४८० या अधिकृत क्रमांकावर व्हॉट्सऍपद्वारे संपर्क साधून शहानिशा करून पहा.

हेही वाचा: शरीरातील ऑक्सिजन मोजण्याचा दावा करणारे ऍप्स कितपत विश्वासार्ह?

More from समाजकारणMore posts in समाजकारण »

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा