Press "Enter" to skip to content

‘गांधीजींबरोबर ३-४ महिला पण मोहन भागवतांसोबत एकही नाही’ राहुल गांधींच्या वक्तव्याचा व्हिडीओ एडीटेड!

कॉंग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भाषणाची एक व्हिडीओ क्लिप सोशल मीडियात जोरदार व्हायरल होतेय. त्यात ते म्हणत आहेत की ‘महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्या बरोबर ३-४ महिला दिसायच्याच पण मोहन भागवतांसोबत (Mohan Bhagwat) कधी कुठल्या महिलेचा फोटो पाहिलाय?’. या वक्तव्यातून राहुल गांधी कसे ‘पप्पू’च आहेत हे सांगण्याचा प्रयत्न केला जातोय.

Advertisement

“गांधीजी बरोबर ३-४ बायका असत पण मोहन भगवंतांबरोबर एक पण बाई नसते –पप्पू ” अशा कॅप्शनसह फेसबुकवर रसिका बर्वे यांनी ती २८ सेकंदाची व्हिडीओ क्लिप अपलोड केलीय. बातमी करेपर्यंत या पोस्टला २०१८ लोकांनी शेअर केले होते तर तब्बल ५ हजार फेसबुक युजर्सने तो पाहिला आहे.

Rasika Barve shared Rahul Gandhi's video clip on facebook
Source: Facebook

‘इंडिया टुडे’चे कार्यकारी संपादक शिव अरुर यांनीही ती व्हिडीओ क्लिप शेअर केलीय. व्हिडीओ शेअर करताना अरुर यांनी थेट काहीही लिहिलेलं नसलं, तरी इमोजीच्या माध्यमातून ते राहुल गांधी हे काय बोलताहेत, असं सुचवू पाहताहेत.

अर्काइव्ह

‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक सुधीर लसनापुरकर यांनी सदर व्हायरल क्लिप निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली.

पडताळणी:

राहुल गांधी यांच्यासमोरील डायसवरून लक्षात येतंय की अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या व्यासपीठावरून भाषण देताहेत. याआधारे गुगलसर्च केलं असता ‘इंडियन नॅशनल कॉंग्रेस’च्या अधिकृत युट्युब चॅनलवरचा १५ सप्टेंबर २०२१ रोजीचा राहुल गांधींच्या संपूर्ण भाषणाचा व्हिडीओ बघायला मिळाला.

या भाषणामध्ये राहुल गांधी (Rahul Gandhi) महात्मा गांधींचे हिंदुत्व आणि संघ-भाजप, नथुराम गोडसे, सावरकर यांचे हिंदुत्व यात किती तफावत होती याविषयी बोलताहेत. यालाच जोडून ते मोहन भागवतांविषयी ( Mohan Bhagwat) बोलताना म्हणतात,

“आपने देखा होगा, अभी गांधीजी की फोटो देखी है आपने. गांधीजीके साथ आपको तीनचार महिलायें दिखेंगीही दिखेंगी. सही?? मोहन भागवत के साथ आपने किसी महिला की फोटो देखी है? कभी देखी है? हो ही नहीं सकता. क्योंकी उनका संघटन महिला शक्ती को दबाता है, क्रश करता है. हमारा संघटन महिला शक्ती को एक प्लॅटफॉर्म देता है. नरेंद्र मोदीने आरएसएस ने महिला को हिंदुस्थान का प्रधानमंत्री नहीं बनाया कॉंग्रेस पार्टीने बनाया.”

संपूर्ण भाषणाच्या मूळ व्हिडिओमध्ये १ तास ३४ सेकंदानंतर राहुल गांधी यांचे व्हायरल व्हिडीओतील वक्तव्य ऐकण्यास मिळते.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये असे लक्षात आले की राहुल गांधी यांच्या संपूर्ण भाषणातील केवळ २८ सेकंदाचा व्हिडीओ कट करून चुकीच्या संदर्भाने व्हायरल केला जात आहे.

राहुल गांधी आपल्या भाषणात महात्मा गांधींचे हिंदुत्व आणि भाजप-संघाचे हिंदुत्व यातील तफावत समजावत आहेत. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघात महिलांचे स्थान आणि कॉंग्रेस पक्षातील महिलांचे स्थान यांची तुलना करत आहेत.

सोशल मीडियावर राहुल गांधींच्या भाषणातील छोटासा तुकडा कट करून त्याआधारे त्यांची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न होताना दिसतोय.

हेही वाचा: राहुल गांधींची ‘बनावट समाजसेवा’ उघडकीस आणणारे व्हिडीओज झाले लीक? वाचा सत्य!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती ‘ चेकपोस्ट मराठी’च्या 9172011480 या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता) 

More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा