Press "Enter" to skip to content

राहुल गांधी जीथे माफी मागायची तिथे धन्यवाद देतायत? वाचा व्हायरल व्हिडीओचे सत्य!

काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचा एका रॅलीतील भाषणाचा 10 सेकंदाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जातोय. या व्हिडिओच्या आधारे राहुल गांधींची खिल्ली उडविली जातेय. आपल्या समर्थकांना पावसामुळे झालेल्या त्रासाबद्दल राहुल गांधी त्यांचे आभार व्यक्त करत असल्याचा दावा केला जातोय.

Advertisement

अर्काइव्ह

फेसबुकवर देखील हा व्हिडीओ शेअर केला जातोय.

पडताळणी:

राहुल गांधी यांचा व्हायरल व्हिडीओ त्यांच्या मणिपूर येथील रॅलीतील भाषणाचा आहे. काँग्रेसच्या अधिकृत युट्युब चॅनेलवरून राहुल गांधी यांच्या भाषणाचा संपूर्ण व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. याच भाषणामधील 10 सेकंदांची क्लिप क्रॉप करण्यात आली आहे.

आपले भाषण संपवताना राहुल गांधी म्हणतात, “आप यहां दूर-दूर से आए, मैं दिल से आपका धन्यवाद करता हूं. आज बारिश थी, आपको कष्ट भी हुआ होगा, इसके लिए बहुत बहुत धन्यवाद. नमस्कार, जय हिंद”

व्हिडिओच्या 01.04.57 सेकंदांपासून आपण राहुल गांधींना ऐकू शकता.

राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून देखील या भाषणाची लाईव्ह लिंक शेअर केली होती.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की राहुल गांधी यांच्या भाषणातील अर्धवट व्हिडिओच्या आधारे त्यांची खिल्ली उडवली जात आहे. राहुल गांधी वास्तविकरीत्या पाऊस सुरु असताना देखील दूर-दूरवरच्या ठिकाणावरून सभेसाठी हजर राहिलेल्या आपल्या समर्थकांना धन्यवाद देताहेत.

हेही वाचा- दलवीर भंडारींची आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी निवड झालेली नाही, व्हायरल दावे फेक!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)

More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा