Press "Enter" to skip to content

राहुल गांधींनी पोलिसाची कॉलर पकडली? वर्दीवर हात टाकला? जाणून घ्या सत्य!

हाथरस सामुहिक बलात्कार घटनेनंतर पिडीतेच्या कुटुंबाला भेटण्यासाठी गेलेले कॉंग्रेस नेते राहुल गांधी आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला. याच दृश्यांतील एक फोटो भाजप कार्यकर्त्यांकडून व्हायरल केला जातोय आणि राहुल गांधी यांनी ऑन ड्युटी पोलीस ऑफिसरची कॉलर पकडल्याचे (Rahul Gandhi Held Policeman’s Collar) दावे करणारे प्रश्न उपस्थिती केले जाताहेत.

Advertisement

‘ऑन ड्युटी पोलिसांच्या वर्दीवर हाथ?’ अशा कॅप्शनसह महाराष्ट्र भाजपचे सोशल मिडिया को-कन्व्हेनर आशिष नावंदर यांनी फेसबुकवर सदर फोटो पोस्ट केलाय.

ऑन ड्युटी पोलिसांच्या वर्दीवर हाथ?

Posted by Adv Ashish Navandar on Thursday, 1 October 2020

अर्काईव्ह लिंक

त्याच पद्धतीने प्रदीप नवले पाटील या फेसबुक युजरने ‘ज्या वर्दीवर हाथ टाकला ती वर्दी वारसहक्काने मिळालेली वर्दी नाही ! ज्या वर्दीचा अपमान केला ती वर्दी खाकी आहे ! वर्दीचा रंग खाकी का असतो हे कदाचीत पप्पूला माहीत नसाव, माहीत असत तर त्याने त्या वर्दीचा अपमान केला नसता !
#कुणीतरी_हे_ही_दाखवा_राव
या कॅप्शनसह फोटो पोस्ट केलाय.

ज्या वर्दीवर हाथ टाकला ती वर्दी वारसहक्काने मिळालेली वर्दी नाही ! ज्या वर्दीचा अपमान केला ती वर्दी खाकी आहे ! वर्दीचा…

Posted by Er Pradip Nawale Patil on Thursday, 1 October 2020

अर्काइव्ह लिंक

ज्या ज्या फेसबुक युजर्सने प्रियांका गांधींच्या वस्त्रांवर हात टाकणाऱ्या पोलिसाचा निषेध करणाऱ्या पोस्ट टाकल्या त्यांच्या कमेंटमध्ये विरोध दर्शवत अनेकांनी हाच फोटो पोस्ट केला असून यावर का कुणी बोलत नाही असा प्रश्न उपस्थित केला जातोय.

अभिनेत्री हेमांगी कवी यांनी टाकलेल्या फेसबुक पोस्टवरील कमेंटचा स्क्रिनशॉट:

hemangi kavi fb post checkpost marathi
Source: Facebook

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’द्वारे आम्ही व्हायरल फोटोला गुगल रिव्हर्स सर्च द्वारे शोधून पाहिले. त्यावेळी झालेल्या घटनेसंबंधी विविध माध्यमांनी दिलेल्या बातम्या समोर आल्या.

१ ऑक्टोबर २०२० रोजी हाथरस सामुहिक बलात्कार प्रकरणी १९ वर्षीय मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर उत्तरप्रदेश पोलिसांनी तिच्या कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने रात्रीतूनच तिच्यावर अंत्यसंस्कार केले. याच्या बातम्या, व्हिडीओज जसे सर्वत्र पसरू लागले तसे विरोधी पक्षांनी योगी सरकारविरोधात आंदोलनाचा पावित्रा घेतला.

पीडीतेच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी गेलेल्या राहुल आणि प्रियांका गांधींच्या गाड्या अडवल्या गेल्या. त्यानंतर त्यांनी पायीच घटनास्थळी पोहचण्याचा निर्णय घेतला. यावेळी पोलिसांनी त्यांची अडवणूक करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या धक्क्याने राहुल गांधी खाली पडले.

सावरून पुन्हा त्यांनी चालण्यास सुरुवात केली परंतु पोलीस त्यांना आडवे येत होते. यावेळी समोरील पोलीस कर्मचाऱ्यास बाजूला काढत राहुल गांधी यांनी आगेकूच केली. त्यानंतर लगेचच पोलिसांनी त्यांना घेराव घातला आणि कलम १४४ म्हणजेच जमावबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याचे सांगत त्यांना ताब्यात घेतले.

समोरील पोलीस कर्मचाऱ्यास बाजूला करत असतानाचा व्हिडीओ कॉंग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवर आपण पाहू शकतो.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले की राहुल गांधी यांनी पोलीस कर्मचाऱ्याच्या वर्दीवर हात उचलला किंवा कॉलर पकडली (Rahul Gandhi Held Policeman’s Collar) असा दावा करणाऱ्या पोस्ट दिशाभूल करणाऱ्या आहेत.

राहुल गांधी यांच्याशी झटापट केल्यानंतर ते पडले आणि सावरून पुन्हा चालू लागले त्यावेळी पुन्हा आडवे येणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यास बाजूला करताना शूट झालेल्या व्हिडीओचा सोयीस्कर स्क्रीनशॉट वापरून भाजप समर्थक आणि कार्यकर्ते दिशाभूल करण्याचा प्रयत्न करताहेत.

हेही वाचा: राहुल गांधी यांच्यावर विरोधकांनी आजवर डागलेल्या ‘फेक’ तोफा !

More from राजकारणMore posts in राजकारण »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा