Press "Enter" to skip to content

रेडिओ गार्डनची संकल्पना अप्रतिमच, पण ती ‘इस्रो’ची निर्मिती नाही!

सोशल मीडियावर रेडिओ गार्डनच्या (Radio Garden) वेबसाईटची लिंक शेअर केली जातेय. या वेबसाईटवर जाऊन जगभरातील वेगवेगळ्या देशांमधील हजारो रेडिओ स्टेशनवरील कार्यक्रम ऐकणं शक्य आहे.

रेडिओ गार्डनची वेबसाईट ओपन केल्यानंतर पृथ्वीगोलावर हिरव्या रंगाचे ठिपके बघायला मिळतात. हे ठिपके म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणच्या रेडिओ स्टेशनचं पृथ्वी गोलावरील स्थान होय. तुम्ही ज्या ठिकाणच्या हिरव्या रंगाच्या ठिपक्यावर क्लीक कराल, त्या रेडिओ केंद्रावरील कार्यक्रम तुम्ही ऐकू शकता.

Advertisement

आता सोशल मीडियावर रेडिओ गार्डनची हीच लिंक व्हायरल होतेय. लिंक शेअर करताना दावा केला जातोय की हे रेडिओ गार्डन ‘इस्रो’ अर्थात भारतीय अंतराळ संस्थेने विकसित केले आहे. त्यासाठी इस्रोचे आभार देखील व्यक्त केले जाताहेत.

http://radio.garden/listen/radio-24/PvVaJ1tsअप्रतिम…आमचा इस्रो 👏👏👏💪💪💪 खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा…..मग तुम्हाला…

Posted by NandedLive.com on Wednesday, 20 July 2022

रेडिओ गार्डनची संकल्पना अगदीच अप्रतिम असली तरी रेडिओ गार्डन ही काही ‘इस्रो’ची निर्मिती नाही. रेडिओ गार्डनच्याच वेबसाईटवरील माहितीनुसार या प्रकल्पाची सुरुवात नेदर्लंड्समधल्या अँमस्टरडॅम शहरातील Puckey & Moniker स्टुडिओकडून करण्यात आली होती. नेदरलँड्स इन्स्टिट्यूट फॉर साउंड अँड व्हिजन द्वारे हाती घेण्यात आलेल्या संशोधन प्रकल्पाचे अपत्य म्हणजे रेडिओ गार्डन होय. Jonathan Puckey हे रेडिओ गार्डनचे निर्माते होत.

भारत सरकारकडून देखील रेडिओ गार्डनच्या निर्मितीशी ‘इस्रो’चा काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट करताना सोशल मीडियावरील व्हायरल मेसेजेस चुकीचे असल्याचे सांगितलेले आहे.

हेही वाचा- माळेगाव घाटातील दरड कोसळल्याचा म्हणून ‘झी २४ तास’ने चालवला आसाममधील व्हिडीओ!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)

More from फॅक्ट फाईल्सMore posts in फॅक्ट फाईल्स »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा