Press "Enter" to skip to content

‘पब्जी गेम’ चायनीज नसताना मिडियाने स्वतःच टाकलं बॅन ऍप्सच्या यादीत!

‘मोदी सरकार का बड़ा फैसला,टिक टॉक ,पबजी (pubg),शेयर इट सहित 59 चीनी एप पर लगाया प्रतिबंध’ न्यूज फोर नेशनची बातमी

टाईम्स नाऊ हिंदी ने ‘चाइनीज ऐप्स बैन किए जाने पर सेलेब्रिटीज ने जताई खुशी, कहा- वायरस को फिर नहीं आने देना चाहिए’ असं म्हणत बातमी देताना लिहिलंय ‘सरकार ने लोकप्रिय ऐप टिक टॉक और पबजी समेत 59 चाइनीज ऐप्स पर बैन लगा दिया है’

Advertisement

‘भारत में TikTok, पबजी समेत कुल 59 ऐप बैन, चाइना को सबक सिखाने के लिए भारत ने अख्तियार किया कड़ा रूख’ म्हणत लाइव्ह सिटीज नावाच्या पोर्टलने बातमी लावलीय.

‘आज की बड़ी खबर | टिकटॉक, पबजी, यूसी ब्राउजर समेत 59 चाइनीज एप्स पर भारत सरकार ने आईटी एक्ट 2000 के तहत लगाया बैन’ अशी दिंडोरी डॉट नेट नावाच्या पोर्टलने बातमी केलीय.

‘भारत की चीन पर डिजिटल स्‍ट्राइक, TikTok-PUBG समेत 59 ऐप पर लगा बैन’ या अशा काही बातम्या वेग वेगळ्या पोर्टल्सवर पहायला मिळाल्या.

‘भारत में TIKTOK, पबजी समेत कुल 59 ऐप बैन, चाइना को सबक सिखाने के लिए भारत ने अख्तियार किया कड़ा रूख’ सांगत नेशन फॉर न्यूजने बातमी दिलीय.

पडताळणी:

दिनांक २९ जून २०२० रोजी भारताने ५९ चीनी ऍप्सवर बंदी आणल्याच्या बातम्या सर्वत्र प्रसिद्ध झाल्या होत्या. तरीही ‘चेकपोस्ट मराठी’ने सर्वात आधी भारत सरकारने जारी केलेलं अधिकृत स्टेटमेंट काय आहे हे शोधण्याचा प्रयत्न केला. PIB म्हणजेच ‘प्रेस इन्फोर्मेशन ब्युरो’च्या अधिकृत ट्विटर हँडलवर आम्हाला भारत सरकारने ५९ चायनीज ऍप्सवर बंदी आणल्याची माहिती मिळाली.

त्या ट्विट सोबतच जे ‘प्रेस रिलीज’ पत्रक जोडले होते त्या मध्ये भारतीय नागरिकांच्या खाजगी माहितीची आणि देशाची सुरक्षितता जपण्यासाठी ही बंदी आणली असल्याचं समजलं. यामध्ये त्या ५९ ऍप्सची यादी सुद्धा दिलेली आहे.

या यादीत टिकटॉक, हेलो, शेअर इट यांसारखे लोकप्रिय ऍप आहेत. ‘क्लॅश ऑफ किंग’ नावाचं गेम ऍप सुद्धा आहे. परंतु ‘पब्जी’चा कुठेही उल्लेख आढळला नाही.

गंमत म्हणजे ज्यांनी या बातम्या दिल्या आहेत त्यांतील अनेकांनी बंदी आणलेल्या ऍप्सची यादी बातमीत टाकलेली आहे. तरीही पब्जीचा समावेश स्वतःहून कसा केलाय हे समजायला मार्ग नाही.

पब्जी चायनीज ऍप नाही

PUBG- Player Unknown’s Battle Grounds म्हणजेच पब्जी बद्दल सर्च करत असताना इकॉनॉमिक टाईम्सची बातमी सापडली ज्यामध्ये टिकटॉकवर बंदी आणली गेली पण पब्जीवर का नाही याचं विश्लेषण केलेलं आहे.

बातमीत असं सांगितलंय की पब्जी गेम चीन मध्ये तयार झालेला नाही. साउथ कोरियाच्या ‘ब्ल्यू होल’ या गेम मेकर कंपनीने बनवलेला आहे. आता त्या ‘ब्ल्यू होल’ला ‘पब्जी कॉर्प’ नावाने ओळखलं जातं. गेम बनवल्यानंतर तो जगभर पोहचवण्यासाठी चायनीज कंपनी ‘Tencent’ या ऍपची वितरक म्हणून पुढे आली एवढाच काय तो पब्जीचा चीनशी संबंध.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये अनेक माध्यमांनी चुकीच्या बातम्या लावत त्या ५९ ऍप्सच्या यादीत पब्जीला गणल्याचं समोर आलं. सोबतच ही सुद्धा वस्तुस्थिती समोर आलीय की पब्जी साउथ कोरिया मध्ये तयार झालेलं ऍप असून चीनच्या कंपनीचा केवळ वितरणात वाटा आहे.

हेही वाचा: बारकोडच्या आधारे चीनी वस्तू ओळखल्या जाऊ शकतात का ?

More from लाइफस्टाइलMore posts in लाइफस्टाइल »
More from समाजकारणMore posts in समाजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा