Press "Enter" to skip to content

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रामायणावर आधारित डाक तिकीट जारी केलेत?

अयोद्धेत येत्या ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर सोशल मिडीयावर राम, राम मंदिर आणि रामायण यासंबंधीचे अनेक दावे-प्रतिदावे देखील केले जाताहेत.

Advertisement

सध्या सोशल मिडीयावर रामायणातील विविध घटना आणि प्रसंगांची माहिती देणाऱ्या एका डाक तिकीटाची खूप चर्चा आहे. दावा करण्यात येतोय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या औचित्यावर जुलै २०२० म्हणजेच नुकतंच हे डाक तिकीट (ramayana stamp) जारी केलंय.  

भाजपचे राष्ट्रीय सचिव बदाम महिपाल रेड्डी यांनी स्टँपचा फोटो टाकलाय. ‘पंतप्रधानांनी जारी  केलेला रामायण स्टँप’ असं त्यांनी कॅप्शनमध्ये  म्हंटलय.

अर्काइव्ह पोस्ट

ट्वीटरवर हाच फोटो आणि त्यासोबत हाच किंवा साधारणतः अशाच प्रकारचा दावा मोठ्या प्रमाणात शेअर केला जातोय.

ट्वीटरसोबतच फेसबुकवर देखील पंतप्रधानांनी तथाकथितरित्या जारी केलेल्या तिकिटाचा फोटो व्हायरल झालाय.

Credit : Facebook

पडताळणी :

आम्ही व्हायरल होत असलेल्या स्टँपचा फोटो गुगल रिव्हर्स सर्चच्या मदतीने शोधला. त्यावेळी आम्हाला ‘पो टूल्स’ या ब्लॉगवर हा फोटो मिळाला. या ब्लॉगवरील माहितीनुसार भारतीय पोस्टाने २२ सप्टेंबर २०१७ रोजी रामायणावरील ११ डाक तिकिटे जारी केले होते.

११ पैकी १० तिकिटे ५ रुपयांची, तर १ तिकीट १५ रुपयांचे होते.

Credit : PO Tools

या माहितीच्या उलटतपासणी साठी ‘आम्ही इंडिया पोस्टेज स्टँप’च्या सरकारी वेबसाईटला भेट देऊन तिथे हे स्टँप (ramayana stamp) शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी या वेबसाईटवर देखील आम्हाला हीच माहिती मिळाली.

Credit : INDIA POSTAGE STAMPS

या माहितीच्या आधारे काही कीवर्डसह गुगलवर शोधाशोध केली असताना आम्हाला ‘NDTV इंडिया’ची एक बातमी सापडली. या बातमीनुसार २०१७ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाराणसी येथे संबंधित डाक तिकिटांचे विमोचन करण्यात आले होते. यावेळी त्यांच्यासोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि तत्कालीन राज्यपाल राम नाईक हे देखील उपस्थित होते.

वस्तुस्थिती :

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये हे स्पष्ट झाले आहे की सोशल मिडीयावर करण्यात आलेले दावे लोकांची दिशाभूल करणारे आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या महिन्यात किंवा नजीकच्या भूतकाळात रामायणावरील डाक तिकिटे जारी केलेली नाहीत.

सोशल मिडीयावर सध्याची म्हणून व्हायरल करण्यात येत असलेली डक तिकिटे मुळात २०१७ सालीच जारी करण्यात आली आहेत. त्यांचा सध्याच्या राम मंदिराच्या भूमिपूजनाशी काहीएक संबंध नाही.   

हे ही वाचा- ‘अयोध्येतील राम मंदिराचे थ्री डी मॉडेल’ म्हणत शेअर होतोय जैन मंदिराचा व्हिडीओ !

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »
More from राजकारणMore posts in राजकारण »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा