Press "Enter" to skip to content

ऍसिड ऍटॅक पीडितांना मॉडेल्स समजून उडवली जातेय अमृता फडणवीसांच्या दानधर्माची खिल्ली

अमृता फडणवीस यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियात व्हायरल होतोय. पाठीमागे ‘कोविड १९ रिलीफ मटेरीअल’ असा बॅनर आणि सोबत कुठल्याशा तरुणीला मदतीचे वितरण करतानाचा हा फोटो सोशल मीडियात अमृता फडणवीस यांची थट्टा उडविण्यासाठी वापरला जातोय.

संघमित्रा पाणीग्रही या चित्रपट निर्मात्या, क्रिएटिव्ह डीरेक्टर आणि लेखक असल्याची माहिती त्या आपल्या फेसबुक बायोमध्ये देतात. त्यांनी फेसबुकवर फडणवीस यांचा फोटो शेअर केलाय. कॅप्शनमध्ये त्या म्हणतात, “देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस गरीब महिला प्रवासी कामगारांना मदत वितरीत करताना”

Advertisement
https://www.facebook.com/photo.php?fbid=881300329015781&set=a.187662618379559&type=3&theater

पाणीग्रही यांची ही पोस्ट ६७ वेळा इतर युजर्सनी शेअर केली आहे.

‘महाविकास आघाडी’ या फेसबुक पेजवरून देखील एक पोस्ट टाकण्यात आलीये. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हंटलय, “ब्रावो देवेन यांच्या पत्नी अमृतावहिनी फडणवीस कोरोना काळात गोरगरिबांना धान्याची किट देऊन मदत करताना…

यातील गरीब नक्की कोण आहे…???

सगळी लबाडी आहे बाकी काय…”

mahavikas aaghadi facebook page screenshot
credit: mahavikas aaghadi facebook page

ट्विटरवर देखील अनेकांनी या गोष्टीवरून अमृता फडणवीस यांना ट्रोल केलंय. कुणी या फोटोमध्ये गरीब कोण हे ओळखायला सांगतंय, कुणाला गरिबीची व्याख्या बदलल्याचा साक्षात्कार झाला तर कुणी ‘एक फकिरी तो है मॅडम’ म्हणत फडणवीस यांची नौटंकी अधोरेखित करण्याचा प्रयत्न करतंय.

याच पद्धतीचे फोटोज आणि त्यावर अमृता फडणवीस यांची थट्टा करणारे मेसेज व्हॉट्सऍपद्वारे सुद्धा फिरत आहेत.

whatsapp virals about amruta fadanvis donation
credit: whatsapp

पडताळणी

अमृता फडणवीस मदत वाटप करतानाचा जो फोटो व्हायरल होतोय, त्यात फडणवीस यांच्या सोबत असणाऱ्या तरुणींच्या ड्रेसवरून एक गोष्ट तर कुणाच्याही  अगदी सहज लक्षात येऊ शकते की त्या तरुणी ‘प्रवासी कामगार’ असण्याची बिलकुल शक्यता नाही. शिवाय त्या गरीब असाव्यात असंही वाटत नाही.

मग हे नेमकं प्रकरण आहे तरी काय हे पडताळण्यासाठी आम्ही अमृता फडणवीस यांचं अधिकृत फेसबुक पेज चेक केलं. फडणवीस यांच्या पेजवर आम्हाला फडणवीस यांचे व्हायरल होत असलेले फोटोज आहेत, त्याच स्वरुपात बघायला मिळाले. फक्त त्या फोटोज सोबत असणाऱ्या कॅप्शनने फोटोजची वस्तुस्थिती समोर आली.

फोटोज सोबतच्या कॅप्शनमध्ये स्पष्ट करण्यात आलंय की फोटोज मुंबईमधील आहेत. दिव्याज फाउंडेशन मार्फत मुंबईमध्ये अॅसीड ऍटॅकमधून बचावलेल्या युवतींना औषधे, खाद्यपदार्थ आणि अत्यावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले. त्यावेळचे हे फोटोज आहेत.

किंबहुना यात असंही लिहिलंय की सर्जरीमुळे त्यांच्या चेहऱ्याची त्वचा अतिशय नाजूक झालेली असते. त्यामुळे त्या मास्क परिधान करू शकत नाहीत.

‪Handed over Medicines, food items & essentials to #acid attack victors & distributed these items to the #acidattack…

Posted by Amruta Fadnavis on Thursday, 4 June 2020

त्यानंतर आम्ही दिव्याज फाउंडेशनच्या अधिकृत फेसबुक पेजला देखील भेट दिली. तिथे देखील हेच फोटोज जवळपास त्याच कॅप्शनसह बघायला मिळाले.

वस्तुस्थिती

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये हे स्पष्ट झाले आहे की अमृता फडणवीस यांनी कुठेही ते फोटोज ‘प्रवासी महिला कामगारांना’ किंवा ‘गरीब महिलांना’ मदत वितरीत करतानाचे असल्याचं म्हंटलेलं नाही.

सोशल मीडियात तरुणींच्या पेहरावाकडे पाहून त्या कुणी उच्चवर्गीय मॉडेल वगैरे आहेत असे समजले जात आहे आणि त्याला ‘प्रवासी महिला कामगार’ वगैरे जोडून खिल्ली उडवली जातेय. अमृता फडणवीस यांचे फोटोज चुकीच्या कॅप्शनसह व्हायरल करण्याचा प्रयत्न केला जातोय. परंतु वस्तुस्थिती हीच आहे की ते फोटोज कुणा मॉडेल्सचे नसून ऍसिड ऍटॅक पीडितांचे आहेत. त्यामुळे या व्हायरल दाव्यांना आम्ही ‘चेकपोस्ट’वरच अडवतोय.

More from राजकारणMore posts in राजकारण »
More from लाइफस्टाइलMore posts in लाइफस्टाइल »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा