महात्मा गांधी (Mahatma Gandhi) आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा (Dr. Babasaheb Ambedkar) एक जुना फोटो सोशल मीडियात व्हायरल होतोय. फोटोमध्ये महात्मा गांधी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पायाला स्पर्श करत असल्याचे बघायला मिळतेय.
‘गांधीजी बाबा साहिब के पांव छुते हुये, ये फोटो आपको कहीं नहीं मिलेगी. फैलाओ!’ अशा कॅप्शनसह तो फोटो व्हायरल होत आहे. फेसबुकवर या दाव्यांचे प्रमाण खूप मोठे आहे.
‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक अंबादास जरारे यांनी व्हॉट्सऍपवरही हा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली.
पडताळणी:
‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल फोटो गुगल लेन्सच्या मदतीने रिव्हर्स ईमेज सर्च करून पाहिला असता सदर व्हायरल फोटो एडीट केलेला असल्याचे समजले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पत्नी डॉ. सविता आंबेडकर आणि त्यांचा कर्मचारी सुदामा अशा तिघांचा एक वेगळा फोटो आहे. अलामी या फोटो स्टॉक वेबसाईटवर तो उपलब्ध आहे.
दुसरा फोटो महात्मा गांधी यांनी केलेल्या मिठाच्या सत्याग्रहावेळचा आहे. ब्रिटिश शासनाने मिठासारख्या जीवनावश्यक गोष्टीवर लावलेल्या कराच्या विरोधात इ.स. १९३० साली घडलेला सत्याग्रह होता. यालाच दांडी सत्याग्रह असेही म्हणतात. मुठभर मीठ उचलून गांधींनी कायदेभंग केला होता. त्यावेळचा हा फोटो आहे. ‘द इंडियन एक्स्प्रेस‘च्या लेखातील फोटो:
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीनुसार हे सिद्ध झाले की व्हायरल फोटो आणि त्यासोबतचा दावा फेक आहे. महात्मा गांधी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पाया पडल्याचे दाखवण्यासाठी व्हायरल हत असलेला फोटो दोन वेगवेगळे फोटो एकत्र करून एडीट केलेला आहे.
हेही वाचा: संविधानाची प्रत जाळणाऱ्यास न्यायालयाने देशद्रोही घोषित करून त्याचे नागरिकत्व रद्द केले?
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
Be First to Comment