Press "Enter" to skip to content

इंदिरा गांधी यांच्या पतीचे नाव ‘फिरोज गांधी’ नव्हे ‘फिरोज खान’ होते? वाचा सत्य!

सोशल मीडियातून गांधी परिवाराबद्दल सातत्याने काही न काही दावे व्हायरल होत असतात. असाच एक अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असलेला दावा म्हणजे ‘इंदिरा गांधी’ यांचे पती ‘फिरोज गांधी’ (feroze gandhi) नव्हे तर ‘फिरोज खान’ (feroze khan) होते.

Advertisement
FB Posts claiming Indira Gandhi's husband Feroz wasnt Gandhi he was Khan
Source: Facebook

या दाव्याची पुष्टी करण्यासाठी अनेक दिवसांपासून एक जुना फोटो व्हायरल होतोय. त्यात पंडित जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी, त्यांचे पती फिरोज खान आणि सासरे युनूस खान असल्याचा दावा करण्यात येतोय.

लोकांना पाहण्यासाठी ७० वर्षांनंतर हा दुर्मिळ फोटो उपलब्ध करून देण्यात आल्याचे कॅप्शन देऊन सदर फोटो शेअर करण्यात येतोय.

बहुत मुश्किल से यह फोटो मिला है,जवाहरलाल नेहरू, इंद्रा गांधी , इंदिरा गांधी के ससुर युनुस खान,इंदिरा गांधी के पति फिरोज खान ।

Posted by Madhavi Yadav on Saturday, 22 August 2020
अर्काइव्ह

अर्काइव्ह पोस्ट

‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक ‘अनिल कचरे‘ यांनी आमच्या 9172011480 या अधिकृत व्हॉट्सऍप क्रमांकावर संपर्क करून सदर दाव्याची पडताळणी करण्याची विनंती केली.

पडताळणी:

  • व्हायरल फोटो आम्ही यांडेक्सवर रिव्हर्स सर्च करून पाहिला तेव्हा आम्ही पोहचलो ‘अलामी‘ या प्रोफेशनल स्टॉक फोटो अर्काइव्ह साईटवर.
  • तिथे आम्हाला या संदर्भातील तीन फोटोज सापडले. या तिन्हींच्या खाली फोटोमधील व्यक्ती जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि निकोलस रोरिक आहेत असे समजले. यात चौथ्या व्यक्तीचे नाव मिळाले नाही.
nehru indira roerich alamy ss on checkpost marathi
Source: Alamy
  • रिव्हर्स सर्च मध्येच आम्हाला तो व्हायरल फोटो विकिपीडियाच्या एका आर्टिकलसाठी वापरल्याचे आढळले. ते आर्टिकल होते मोहम्मद युनुस खान यांच्या नावे. त्यात वापरण्यात आलेल्या फोटोमध्ये सदर फोटोत नेहरू, इंदिरा गांधी, निकोलस रोरिक आणि मोहम्मद युनुस खान असल्याचे सांगण्यात आले आहे.
mohammad yunus khan wikipedia SS checkpost marathi
  • फोटोचा मूळ स्रोत शोधला असता आम्हाला हेलेना रोरिक यांनी लिहिलेल्या सर्व पत्रांचा संग्रह असलेले एक पुस्तक मिळाले. ते डाउनलोड करून जेव्हा शोधाशोध केली तेव्हा त्यात या व्हायरल फोटोचे संदर्भ सापडणे सोपे झाले.
  • या पुस्तकात पंडित नेहरू आणि इंदिरा गांधी असणारे तीन फोटोज आहेत. त्यापैकी एका ग्रुप फोटोवर रशियन भाषेत दिलेल्या कॅप्शनमध्ये फोटोत उपस्थित असणाऱ्या लोकांची नावे सुद्धा आहेत.
nehru's photo in helena roerich letters checkpost marathi
Source: Helena Roerich letters & Google translation

कोण होते निकोलस रोरिक?

  • निकोलस रोरिक हे मोठे रशियन चित्रकार होते. न्यूयॉर्कमधील निकोलस रोरीक संग्रहालयानुसार (एनआरएम), डिसेंबर 1923 मध्ये ते मुंबईत आले आणि त्यांनी “सांस्कृतिक केंद्र आणि ऐतिहासिक स्थळांचा दौरा सुरू केला”.
  • भारत प्रवासानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी हिमाचल प्रदेशातील कुलूमध्ये स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. कुलुमध्ये आजही त्यांच्या कलाकृतींचे, घराचे संग्रहालय आहे. ‘द रोरिक मेमोरियल ट्रस्ट‘ याची निगराणी करते.

कोण होते मोहम्मद युनुस खान?

  • ‘द ट्रिब्युन’ने मोहम्मद युनुस खान गेल्याची बातमी केली होती, त्यातील माहितीनुसार युनुस खान हे मुत्सद्दी आणि इंदिरा गांधी यांचे निकटवर्तीय होते. ते भारतीय परराष्ट्र सेवेत होते आणि माजी पंतप्रधानांसाठी विशेष दूत होते.
  • विद्यार्थीदशेत असतानाच त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला होता. खान अब्दुल गफार खान उर्फ सरहद गांधी यांचे ते भाचे होते.

इंदिरा गांधी यांचे सासर:

  • व्हायरल फोटोमध्ये इंदिरा गांधी यांचे पती आणि सासरे दोघेही नाहीत हे स्पष्ट झाले असले तरीही त्या दाव्यात पतीचे नाव फिरोज खान आणि सासऱ्यांचे नाव युनुस खान असे लिहिले आहे.
  • ही दोन्ही नावे चुकीची आहेत. त्यांच्या पतीचे नाव ‘फिरोज गांधी’ (feroze gandhi) होते आणि सासऱ्यांचे नाव ‘फरीदून जहांगीर घांडी’ असे होते.
  • पंडित नेहरू यांचा इंदिरा आणि फिरोज यांच्या लग्नास नकार होता म्हणून महात्मा गांधी यांनी मध्यस्थी करून फिरोज यांना स्वतःचे मानसपुत्र बनवून घेतले. तेव्हापासून फिरोज ‘घांडी’ ऐवजी ‘गांधी’ असे आडनाव लावतात. असे विविध मिडिया रिपोर्ट्समध्ये वाचायला मिळते.

फिरोज गांधी मुस्लीम होते?

  • इंदिरा गांधी यांचे पती मुस्लीम होते असा दावा करण्यासाठी अनेक लोक ‘फिरोज’ यांचे आधीचे नाव ‘गांधी’ किंवा ‘घांडी’ नसून ‘खान’ अथवा ‘शाह’ होते असे दावे करताना आढळतात. त्यांच्या आडनावाबद्दल ठोस आणि विश्वासार्ह माहिती कुठे आढळली नाही परंतु त्यांच्या मुस्लीम नसण्याबद्दल काही पुरावे आढळतात.
  • बीबीसी हिंदीच्या रिपोर्टनुसार फिरोज गांधी (feroze gandhi) यांचा मृत्यू वयाच्या अवघ्या ४७ व्या वर्षी हृदयविकाराने झाला. तो झटका दुसरा होता, पहिल्या झटक्यातून ते जेव्हा सावरले तेव्हा त्यांनी त्यांच्या मित्रांना सांगून ठेवले होते की जर माझा मृत्यू झाला तर ‘पारसी’ पद्धतीने अंत्यसंस्कार करू नयेत. (पारसी पद्धतीमध्ये मृतदेह पक्ष्यांना खाण्यासाठी ठेवतात’) मला हिंदू पद्धतीने अग्निदाह देऊन अलविदा करावे.
  • राजीव गांधी यांनी ९ सप्टेंबर १९६० रोजी वयाच्या सोळाव्या वर्षी फिरोज गांधी (feroze gandhi) यांना अग्नी दिला होता. इंदिरा गांधी यांनी पारसी धर्माचा मान राखत अग्नी देण्याआधी पारसी पद्धतीने काही विधी केले होते.
  • एवढेच नव्हे तर त्यांच्या अस्थींचा कलश अलाहबादच्या संगमात सोडला तर अर्धा भाग अलाहाबादच्या पारसी कब्रस्तान मध्ये दफन केला गेला. या दोन्ही पद्धतींमध्ये मुस्लीम धर्माचा, विधींचा कुठेही उल्लेख नाही याचाच अर्थ त्यांचा मुस्लीम धर्माशी काहीएक संबंध नव्हता.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये हे सिद्ध झाले की व्हायरल फोटोमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, चित्रकार निकोलस रोरिक आणि सर्वात शेवटी मोहम्मद युनुस खान आहेत.

या फोटोत इंदिरा गांधी यांचे पती आणि सासरे दोघेही नाहीत. इंदिरा गांधी यांच्या सासऱ्याचे नाव युनुस खान नव्हे तर ‘फरीदून जहांगीर घांडी’ असे होते.

इंदिरा गांधी यांच्या पतीच्या नावासमोर खान लाऊन ते मुस्लीम असल्याचा जो दावा केला जातो त्यातही काही तथ्य नाही. हे दावे अगदीच निराधार आहेत.

हेही वाचा: राहुल गांधी यांच्यावर विरोधकांनी आजवर डागलेल्या ‘फेक’ तोफा !

More from राजकारणMore posts in राजकारण »

3 Comments

  1. मुरलीधर चिंतामण पाटील घोडसगाव त.शिरपूर जिल्हा धुळे मुरलीधर चिंतामण पाटील घोडसगाव त.शिरपूर जिल्हा धुळे December 23, 2021

    भारतात व्यक्ती स्वतंत्र आहे त्यामुळे हिंदू मुस्लिम वाद झाला की त्याला प्रसिध्दी माध्यम याना भारत पाकिस्तान क्रिकेट सारखे महत्व देऊन बिन बुदाचे मुस्लिम धार्जिणे संभोदून हिंदूंना अल्प संख्याक ना नेहमी हिणवले जाते आजही भारतातून पकिस्था गेले मुस्लिम याना कुठलेही स्थान नाही कट्टर मुस्लिम हे हिंदुस्थानात फक्त पैसे इस्लाम धर्म वाढ करणे साठी देतात त्यांना मुस्लिम बद्दल प्रेम नाही .असो जवाहर लाल नेहरू असो की इंदिरा गांधी राजीव गांधी सोनिया गांधी यांना भाजपा ने बिन काम बदनाम करून सत्ता हस्तगत केली परंतु लोकशाहीत भारतात कमी शिक्षण असल्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला मीडिया चुकीच्या बातमीत खत पाणी घालताना दिसतात.

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा