Press "Enter" to skip to content

साक्षी महाराज यांनी शेअर केलेला हिंसक मुस्लिम जमावाचा फोटो भारतातील नाही!

विवादास्पद विधाने देण्यासाठी प्रसिद्ध असलेले उत्तर प्रदेशातील उन्नावचे खासदार आणि भाजप नेते साक्षी महाराज (Sakshi Maharaj) हे आपल्या अजून एका विवादास्पद फेसबुक पोस्टमुळे चर्चेत

Advertisement
आले आहेत. त्यांनी आपल्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवरून एका हिंसक जमावाचा फोटो शेअर केलाय. या फोटोमध्ये जमावाच्या हातात तलवारी आणि इतर शस्त्रास्त्रे बघायला मिळताहेत.

साक्षी महाराज यांनी हा फोटो शेअर करताना अशा प्रकारचा हिंसक जमाव तुमच्या घरावर चालून आला तर स्वसंरक्षणार्थ तुमच्याकडे काही आहे का असा सवाल केलाय. अशा वेळी पोलीस वाचवायला येणार नाहीत, त्यामुळे तुमच्या सुरक्षेची जबाबदारी तुम्हीच घ्या आणि घरात शस्त्रास्त्रांचा साठा करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. साक्षी महाराज यांनी पोस्ट केलेला हा फोटो जवळपास 1110 पेक्षा अधिक युजर्सकडून शेअर करण्यात आलाय.

Sakshi maharaj shared pic of muslim crowd running with naked swords
Source: Facebook

पडताळणी:

साक्षी महाराज यांनी पोस्ट केलेला फोटो आम्ही रिव्हर्स इमेज सर्चच्या मदतीने शोधला असता आम्हाला ‘टाईम तुर्क’ या न्यूज वेबसाईटवर 7 मे 2013 रोजी प्रकाशित न्यूज रिपोर्टमध्ये हा फोटो मिळाला.

Time-Turk-News-Screen-shot
Source: Time Turk News

‘टाईम तुर्क’च्या रिपोर्टनुसार बांग्लादेशमध्ये ‘हिफाजत-ए-इस्लाम’ या संघटनेने सरकार विरोधात केलेल्या बंडाच्या वेळचा हा फोटो असून या हिंसक दंगलीत जवळपास 100 लोक मारले गेले होते. शिवाय 100 च्या आसपास लोक जखमी झाले होते. याविषयीची माहिती मिळविण्यासाठी अधिक शोध घेतला असता 6 मे 2013 रोजीची बीबीसीची बातमी सापडली. BBC च्या बातमीमधील माहिती ही पूर्वीच्या माहितीला दुजोरा देणारीच आहे. 

अलामीच्या वेबसाईटवर देखील या दंगलीवेळचे काही फोटोज उपलब्ध आहेत. ज्यामध्ये आपल्याला साक्षी महाराजांच्या पोस्ट मधील निळा कुर्ता घातलेली व्यक्ती वेगवेगळ्या अँगल्समधून पहायला मिळेल.

फोटोजखाली असणाऱ्या डीटेल्समध्ये फोटोग्राफर फिरोज अहमद यांना या फोटोजचे क्रेडिट देण्यात आले आहे. हा फोटो 5 मे 2013 रोजी घेण्यात आला असल्याची माहिती देखील यामध्ये देण्यात आली आहे.

प्रसिद्ध बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांचं एक ट्विट देखील आम्हाला मिळालं. नसरीन यांच्या 2019 सालच्या या ट्विटमध्ये हा फोटो आहे आणि शेख हसीना यांच्या नेतृत्वाखालील बांगलादेश, असं त्यांनी आपल्या कॅप्शनमध्ये म्हटलंय.

वस्तुस्थिती:

चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये हे स्पष्ट झाले आहे की भाजप खासदार साक्षी महाराज यांनी पोस्ट केलेला फोटो भारतातील नाही, तर तो बांग्लादेशमधील दंगली दरम्यानचा आहे.

उजव्या विचारसरणीच्या समर्थकांकडून यापूर्वी देखील हा फोटो बंगळुरू येथे झालेल्या दंगलींचा असल्याचा दावा करण्यात आला होता. काहींनी हाच फोटो शेअर करत तो केरळमधील असल्याचे देखील म्हंटले होते.

हेही वाचा- हिंदू देवतेचा अपमान करणारा हा व्यक्ती मोहमद अंसारी नाही, तर आझाद कुमार गौतम आहे !

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »
More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा