Press "Enter" to skip to content

उद्धव ठाकरेंनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेच्या आधारे इंदिरा गांधींचा फोटो ठेवल्याचे दावे फेक!

‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Shivaji Maharaj) फोटोवर लाकडी चौकट टेकवून, आपल्या ‘नव्या मातोश्रींना’ नमस्कार करताना, आपले कर्तबगार सेनाप्रमुख कृतकृत्य झाले!’ अशा कॅप्शनसह एक फोटो सोशल मीडियात व्हायरल होतोय.

Advertisement
May be an image of 1 person and text that says "छ.शिवाजी महाराजांच्या फोटोवर लाकडी चौकट टेकवून आपल्या "नव्या मातोश्रींना" नमस्कार करतांना, आपले कर्तबगार सेनाप्रमुख.... कृतकृत्य झाले."
Source: Facebook

‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक एल.बी. चौधरी, राजेंद्र काळे आणि डॉ. मंगेश गुजराथी यांनी मराठी प्रमाणेच इंग्रजीफेसबुक, ट्विटर तसेच व्हॉट्सऍपवरही हे दावे जोरदार व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली.

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल फोटो रिव्हर्स सर्च करून बघितला असता ‘CMO Maharashtra’ या मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी करण्यात आलेले ट्विट सापडले. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन केल्याची माहिती देण्यात आली आहे. यातील फोटो आणि व्हायरल फोटो एकसारखाच आहे, म्हणजेच फोटो एडीट केलेला नाही हे स्पष्ट झाले.

मात्र या फोटोमध्ये खरेच शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला आधार बनवून इंदिरा गांधींची प्रतिमा ठेवण्यात आली आहे का, हे स्पष्ट होत नाही. त्यामुळे अधिक शोध घेतला असता सह्याद्री वाहिनीच्या बातमीत या अभिवादनाचा व्हिडीओ आम्हाला मिळाला.

व्हिडीओच्या ०.३२ सेकंदाला आपणास वेगळ्या कोनातून अभिवादन करणारे उद्धव ठाकरे दिसत आहेत. त्यामध्ये हेही सहज दिसून येतेय की शिवाजी महाराजांच्या प्रतिमेपासून काही अंतरावर लाकडी स्टँड आहे आणि त्यावर इंदिरा गांधी यांची प्रतिमा ठेवलीय. या लाकडी स्टँडला उभे ठेवण्यासाठी त्याच्याच मागच्या दांडीवर सर्व भर आहे, शिवाजी महाराजांच्या प्रतिमेवर नाही.

याच दिवशी लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल (Sardar Vallabhbhai Patel) यांची जयंती होती. त्यांच्याही प्रतिमेस पुष्पहार घालून उद्धव ठाकरे यांनी अभिवादन केले होते.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अभिवादन करत असलेली माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची प्रतिमा छत्रपती शिवाजी महाराजांच्या तसबिरीच्या आधारे उभी केलेली नाही. त्यासाठी महाराजांच्या प्रतिमेपासून काही अंतरावर लाकडी स्टँड आहे. म्हणजेच व्हायरल दावे फेक असून दिशाभूल करणारे आहेत.

हेही वाचा: ठाकरे सरकारने शिवाजी पार्क दिवाळी रोषणाईत ‘ईद’च्या शुभेच्छा दिल्याचे दावे चुकीचे!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)

More from राजकारणMore posts in राजकारण »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा