Press "Enter" to skip to content

आरएसएस कार्यवाहकावरील हल्ला दाखविण्यासाठी वापरला जातोय अभिनेत्याचा फोटो!

सोशल मीडियावर एक ग्राफिक मोठ्या प्रमाणात शेअर केलं जातंय. दावा केला जातोय की देवभूमी केरळमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या चंद्रबोस नामक कार्यवाहकावर मुस्लिम व्यक्तीच्या लग्नाला हजेरी लावल्याबद्दल जीवघेणा हल्ला (rss worker attacked) करण्यात आलाय.

चंद्रबोसला न्याय मिळवून देण्यासाठी ट्विटर आणि फेसबुकवर #justiceforchandraboss नावाची मोहीम चालवण्यात आली आणि हा हॅशटॅग ट्रेंड देखील करायला लागला.

केरळमध्ये ‘हिंदू खतरे में’ असल्याचे दावे केले जाताहेत. अनेकांनी केरळमधील डाव्या सरकारचा निषेध करत सत्तांतरानंतर हिशेब चुकते केले जातील, असंही सांगितलंय. १०० टक्के साक्षरता असलेल्या केरळमध्ये मानवता मात्र शिल्लक राहिली नसल्याची खंत व्यक्त करत केरळचा निषेध केला जातोय.

Advertisement

अर्काइव्ह पोस्ट

पडताळणी :

चंद्रबोसला न्याय मिळवून देण्यासाठी चालविण्यात आलेल्या #justiceforchandraboss या हॅशटॅगखाली करण्यात आलेल्या अनेक ट्विटसमध्ये केरळ वासियांच्या साक्षरतेचा उल्लेख करण्यात आलाय.

सोशल मीडियावर पसरविण्यात आलेले दावे खोटे असल्याचे स्पष्ट करताना मात्र केरळ वासियांनी याच साक्षरतेचा परिचय दिला. #justiceforchandraboss या हॅशटॅगखालीच करण्यात आलेल्या ट्विट्समध्ये आम्हाला व्हायरल फोटो काऱीक्कू नावाच्या वेबसिरीज मधील असल्याचं समजलं.

काऱीक्कू टीम फुकटात जाहिरात केल्याबद्दल ह्या लोकांचे आभार मानू शकते असंही म्हंटलं गेलंय.

अनेकांनी  काऱीक्कूच्या सेटवरील फोटो शेअर करत खोटारडे दावे पसरविणारे लोक १०० टक्के मूर्ख असल्याचं म्हटलंय.

ट्विटर युजर्सकडून मिळालेल्या माहितीची स्वातंत्र्यरित्या पडताळणी करण्यासाठी आम्ही काऱीक्कूबद्दल सर्च केलं त्यावेळी युट्यूबवर याच नावाने असलेल्या चॅनेलवर १८ ऑगस्ट २०२० रोजी अपलोड करण्यात आलेला ‘स्माईल प्लिज’ नावाचा एपिसोड मिळाला.

आम्ही ‘स्माईल प्लिज’ हा एपिसोड लक्ष्यपूर्वक बघितला. एपिसोडमध्ये १४ मिनिट ३२ सेकंदांनंतर व्हायरल फोटोतील कलाकाराचा प्रवेश झालेला बघायला मिळाला. त्याच्या अंगावर व्हायरल फोटोमध्ये जे कपडे आहेत, तेच एपिसोडमध्ये देखील असल्याचे लक्षात आले.

शिवाय एपिसोडमध्ये २२ मिनिटे ३० सेकंदानंतर मारहाणीचे दृश्य देखील आम्हाला बघायला मिळाले. एपिसोडच्या शेवटी देखील गळयात अडकवलेल्या प्लास्टर केलेल्या हाताचा फोटो देखील बघायला मिळाला.

‘स्माईल प्लिज’च्या डिस्क्रिप्शनमध्ये सहभागी कलाकारांची क्रेडिट लिस्ट देण्यात आली आहे. त्यातल्या नावांचा शोध घेतला असता व्हायरल फोटोतील कलाकार अर्जुन रतन असल्याचे समजले. अर्जुन रतन यांनी १९ ऑगस्ट रोजी हाच फोटो आपल्या इंस्टाग्राम प्रोफाईलवरून शेअर केला असल्याचं देखील आढळून आलं.

वस्तुस्थिती :

आमच्या पडताळणीमध्ये स्पष्ट झालं आहे की केरळमध्ये आरएसएस कार्यवाहकावर जीवघेण्या हल्ल्याचे (rss worker attacked) दावे चुकीचे आहेत. आरएसएस कार्यवाहकावर हल्ला झाल्याचं सांगण्यासाठी वापरण्यात आलेला फोटो ‘काऱीक्कू’ या वेबसिरीजच्या ‘स्माईल प्लिज’ या एपिसोडमधील अर्जुन रतन या अभिनेत्याचा आहे.

हे ही वाचा- कालीमातेच्या मूर्तीला अपघाताने आग; पण भाजप नेत्याने दिला धार्मिक द्वेषाचा रंग!

More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा