Press "Enter" to skip to content

हातात बंदूक आणि लॅपटॉप घेतलेला तालिबानी अफगाणिस्तान सेंट्रल बँकेचा गव्हर्नर हाजी मोहम्मद इद्रिस नाही!

सोशल मीडियावर एक फोटो प्रचंड व्हायरल होतोय. फोटोमध्ये एक तालिबानी हातात लॅपटॉप आणि बंदूक घेऊन बसलेला दिसत आहे. दावा केला जातोय की हा तालिबानी अफगाणिस्तानची मध्यवर्ती बँक ‘दा अफगाणिस्तान बँक’चा गव्हर्नर हाजी मोहम्मद इद्रिस (Haji Mohammad Idris) आहे.

Advertisement

‘रिपब्लिक भारत’, ‘टीव्ही ९ भारतवर्ष’, ‘आज तक’, ‘वन इंडिया हिंदी’, ‘इंडिया टुडे’ यांसारख्या माध्यमांनी आपल्या बातम्यांमध्ये यासंदर्भात बातम्या दिल्या आहेत. सोशल मीडिया युजर्सकडून ‘इंडिया टुडे’च्या इंस्टाग्राम पोस्टचा स्क्रिनशॉट शेअर केला जातोय.

अर्काइव्ह

काही युजर्सकडून ‘आज तक’च्या बातमीचा स्क्रिनशॉट देखील शेअर करण्यात येतोय. 

अर्काइव्ह

पडताळणी:

आम्ही इंटरनेटवर हाजी मोहम्मद इद्रिसचा (Haji Mohammad Idris) फोटो शोधण्याचा प्रयत्न केला असता मुहम्मद जलाल या अफगाणी राजकीय कार्यकर्त्याचे ट्विट मिळाले.

या ट्विटमध्ये हाजी मोहम्मद इद्रिसची अफगाण बँकेचे नवीन गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची माहिती देण्यात आली होती. ट्विटमध्ये इद्रिसचा फोटो देखील पोस्ट करण्यात आला आहे. हा फोटो व्हायरल फोटोशी जुळणारा नाही.

‘दा अफगाणिस्तान बँक’च्या ट्विटर हॅण्डलवरून देखील ६ सप्टेंबर रोजी हाजी मोहम्मद इद्रिसच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीचे फोटोज अपलोड करण्यात आले आहेत. या फोटोत देखील हाजी मोहम्मद इद्रिस बघायला मिळताहेत. हा फोटो व्हायरल फोटोपेक्षा वेगळा आहे.

अफगाणिस्थानातील स्थानिक पत्रकाराने ‘बूम’शी बोलताना हा भारतात व्हायरल होत असलेला फोटो हाजी मोहम्मद इद्रिसचा नसून तो एका सामान्य तालिबान्याचा फोटो असल्याचे सांगितले आहे. हातात बंदूक आणि लॅपटॉप असलेला तालिबानी आणि हाजी मोहम्मद इद्रिसच्या फोटोची तुलना केली असता हे स्पष्ट होते की दोघेही वेगवेगळे व्यक्ती आहेत. 

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की हातात बंदूक आणि लॅपटॉप घेतलेला तालिबानी अफगाणिस्तान सेंट्रल बँकेचा गव्हर्नर हाजी मोहम्मद इद्रिस नाही. माध्यमांनी चुकीच्या फोटोजसह फेक बातम्या दिल्या आहेत.

हेही वाचा- तालिबान्यांशी लढणाऱ्या चिमुकलीचा म्हणून ‘झी हिंदुस्थान’ने चालवला वर्षभरापूर्वीचा व्हिडीओ!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती ‘च्चेयाकपोस्ट मराठी’च्या 9172011480 या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता) 

More from फॅक्ट फाईल्सMore posts in फॅक्ट फाईल्स »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा