Press "Enter" to skip to content

पॅलेस्टिनी लोक भारतीय तिरंगा जाळत असल्याच्या दाव्यासाठी वापरला जातोय पाकिस्तानातील फोटो!

सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होतोय. या फोटोमध्ये काही लोक अमेरिका, इजराईल आणि भारताच्या झेंड्याची होळी करताना दिसताहेत. सोशल मीडियावर दावा केला जातोय की भारतीय राष्ट्रध्वज जाळणारे हे लोक पॅलेस्टिनी मुस्लिम आहेत (Palestinians burning Indian flag). भारतीय राष्ट्रध्वजाचा अपमान केला जात असताना देखील इजराईल-पॅलेस्टाईन संघर्षात अनेक भारतीयांकडून पॅलेस्टाईनला पाठिंबा देण्यात येत असल्याबद्दल रोष व्यक्त करण्यात येतोय.

Advertisement

‘आय अपोझ कन्व्हर्जन’ या ट्विटर अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आलेल्या या फोटोच्या कॅप्शनमध्ये म्हण्टलंय,

“कट्टरपंथी पॅलेस्टिनी लोकांकडून भारतीय ध्वज जाळण्यात येतोय, तरी देखील अनेक शांतताप्रिय भारतीयांकडून केवळ धर्माच्या नावाखाली पॅलेस्टाईनला पाठिंबा दिला जातोय.”

अर्काइव्ह

पडताळणी:

व्हायरल फोटो लक्ष्यपूर्वक बघितला असता फोटोमध्ये मागच्या बाजूला एक बॅनर बघायला मिळतो. या बॅनरवर उजव्या बाजूला मशिदीचा फोटो आहे. फोटोच्या अगदी खालोखाल PLFPAKISTAN.ORG असं लिहिलेलं बघायला मिळेल. यावरूनच हा फोटो पाकिस्तानमधील असल्याचं स्पष्ट होतं. 

फोटो नेमका कधीचा आणि कुठला आहे हे शोधण्यासाठी आम्ही गुगल रिव्हर्स सर्चची मदत घेतली. आम्हाला ‘यूएस न्यूज’च्या वेबसाईटवर दि. ११ मे २०२१ रोजी प्रकाशित बातमी मिळाली. या बातमीमध्ये हा फोटो वापरण्यात आला आहे.

us news photo with caption
Source: US news

यूएस न्यूजच्या बातमीमध्ये वापरण्यात आलेल्या फोटोच्या कॅप्शननुसार हा फोटो पाकिस्तानच्या काराचीमधील आहे. इजराईल-पॅलेस्टाईन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ११ मे रोजी पाकिस्तानच्या कराचीमध्ये सिव्हिल सोसायटी सदस्यांकडून पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आला होता.

मोर्चामध्ये भारत, अमेरिका आणि इजराईलच्या झेंड्याची होळी करण्यात आली. इजराईलने पॅलेस्टाईनवर केलेल्या हल्ल्याचा निषेध करताना इजराईल हे अवैध राष्ट्र असल्याचे बॅनर फडकविण्यात आले.

फोटोच्या क्रेडिट्सवरून फरीद खान यांनी ‘असोशिएटेड प्रेस’ या वृत्तसंस्थेसाठी हा फोटो घेतला असल्याची माहिती देखील मिळाली.     

इजराईल-पॅलेस्टाईन संघर्षात केवळ सोशल मीडियावरील युजर्सकडूनच नाही तर भारताने अधिकृतरीत्या पॅलेस्टाईनला पाठिंबा दिलेला आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीत भारताचे प्रतिनिधी टी.एस.तिरुमूर्ती यांनी भारताची भूमिका स्पष्ट करताना पॅलेस्टाइनला पाठिंबा जाहीर केलेला आहे.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की पॅलेस्टिनी नागरिकांनी भारतीय तिरंगा जाळल्याचा सोशल मीडियावरील दावा (Palestinians burning Indian flag) पूर्णपणे चुकीचा आहे. सोशल मीडियावरील व्हायरल फोटो पॅलेस्टाईनमधील नसून पाकिस्तानातील आहे. पाकिस्तानच्या कराची येथे पाकिस्तानी सिव्हिल सोसायटीकडून भारतीय तिरंगा जाळण्यात आला होता.

हे ही वाचा- कतारमधील पॅलेस्टाईन समर्थकांच्या निदर्शनाचा व्हिडीओ राहुल गांधींच्या मतदारसंघातील म्हणून व्हायरल!

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »
More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा