Press "Enter" to skip to content

नरेंद्र मोदींचा जिनपिंग यांच्यासमोर झुकून नमस्कार करतानाचा फोटो फेक!

भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासमोर झुकून नमस्कार करत असतानाचा फोटो सोशल मिडीयावर व्हायरल होतोय.

‘गो स्लो प्लीज’ या ट्विटर हँडलवरून ‘अंधभक्त मोदींची पूजा करताना आणि मोदी जिनपिंग यांची पूजा करताना’ या कॅप्शनसह हा फोटो ट्वीट करण्यात आलाय. हे ट्वीट १०६ वेळा रीट्वीट करण्यात आलंय.

तोच फोटो, त्याच कॅप्शनसह फेसबुकवर देखील अक्षित भारद्वाज या अकाऊंटवरून  शेअर करण्यात आलाय.

https://www.facebook.com/photo.php?fbid=952092558591411&set=a.191366447997363&type=3&theater

‘स्पिरीट ऑफ काँग्रेस’ हँडलवरून करण्यात आलेल्या ट्वीटनुसार मोदींनी जिनपिंग यांना इम्प्रेस करण्यासाठी लाल रंगाचा कोट घातलाय. हे ट्वीट १६८ वेळा रीट्वीट करण्यात आलंय.

रेश्मा आलम यांच्यानुसार ‘याच क्षणानंतर चीनला घुसखोरी करण्याची हिम्मत मिळाली’ रेश्मा यांचं ट्वीट देखील ९८ जणांनी रीट्वीट केलंय.

पडताळणी

‘चेकपोस्ट मराठी’ने या फोटोची सत्यता पडताळून बघण्यासाठी गुगल रिवर्स इमेजच्या सहाय्याने पडताळणी केली. त्यावेळी मूळ फोटो चीनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या २०१९ सालच्या भारत दौऱ्याच्या वेळचा असल्याचे लक्षात आले.

११ ऑक्टोबर २०१९ रोजी भारत दौऱ्यावर असलेल्या जिनपिंग यांनी तामिळनाडू मधील महाबलीपुरमला भेट दिली होती. त्या भेटीदरम्यानचा हा फोटो आहे.

Modi speaks with Xi jinping

‘सकाळ टाईम्स’ने मोदी-जिनपिंग यांच्या महाबलीपुरम येथील भेटीची बातमी कव्हर करताना हाच फोटो फिचर फोटो म्हणून वापरलेला असल्याचे आम्हाला आढळून आले.

‘सकाळ टाईम्स’च्या बातमीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचे गाईड म्हणून अगदी एखाद्या व्यावसायिक गाईड प्रमाणे महाबलीपुरमच्या समृद्ध वारशाची माहिती जिनपिंग यांना दिली.

याच बातमीनुसार मूळ फोटोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तमिळ संस्कृतीचा भाग असणारी वेष्टी (पांढरी धोती) आणि हाफ बाह्यांचा शर्ट घातलेला आहे. तसेच खांद्यावर दाक्षिणात्य पद्धतीचे अंगवस्त्रम (रुमाल) देखील आहे.

नरेंद्र मोदी आणि शी जिनपिंग यांच्या महाबलीपूरम येथील भेटीचा रिपोर्ट देणाऱ्या अनेक बातम्यांमध्ये आम्हाला हा फोटो बघायला मिळाला. काही बातम्यांमध्ये फोटोचं क्रेडीट ‘पीटीआय’ या न्यूज एजन्सीला देण्यात आलंय, तर काही ठिकाणी फोटो क्रेडीट ट्विटर आहे.

नरेंद्र मोदी २०१४ साली तुमकुरला गेले होते तेव्हा तेथील महापौर गीता रुद्रेश यांना झुकून नमस्कार केला होता. त्यावेळी अनेक स्थानिक वर्तमानपत्रात हा फोटो प्रसिद्ध झाला होता. काही दिवसांपूर्वी हाच फोटो नरेंद्र मोदी उद्योगपती गौतम अदानी यांच्या पत्नीसमोर झुकून नमस्कार करत आहेत असा दावा होऊन फिरत होता.

खात्री साठी बातमी आणि ट्विटची तारीख आपण पाहू शकता २५ सप्टेंबर २०१४.

वस्तुस्थिती

चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये ही गोष्ट स्पष्ट झाली की पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सोशल मिडीयावर व्हायरल होत असलेला फोटो फेक आहे.

debunking truth behind viral photo of modi and jinping

चीनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या गतवर्षीच्या भारत दौऱ्यातील महाबलीपुरम येथील भेटी दरम्यानच्या मूळ फोटोमध्ये मोदी यांच्या २०१४ सालच्या तुमकुर भेटीचा फोटो एकत्र एडीट केलाय. अशी दोन फोटोंशी छेडछाड करून सोशल मिडीयावर फेक फोटो व्हायरल करण्यात येतोय.

More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा