fbpx Press "Enter" to skip to content

मुस्लीम युवक हिंदू वेद-उपनिषदांमध्ये चुकीचे बदल करून प्रकाशित करताहेत?

‘हमारे धर्म ग्रंथों में मिलावट करने का कार्य जोरों से चल रहा है, आने वाले 20 साल बाद हमारी अगली पीढ़ियां ये #मिलावटी वेद, पुराण, उपनिषद पढ़ेंगे।’ या आशयाची लांबलचक पोस्ट एका फोटोसह सोशल मीडियात दणदणीत व्हायरल होत आहे. पारंपरिक मुस्लीम पेहरावात दिसणारे काही युवक पुस्तकांच्या ढिगाऱ्याजवळ बसलेले असून त्यांच्यासमोरील पुस्तकांमध्ये अथर्ववेदाचा (Muslim youth Hindu Vedas) देखील समावेश आहे.

Advertisement

काय आहे कॅप्शन?

‘देखो और ध्यान दो और क्या हो रहा है हमारे देश में हमारे धर्म ग्रंथों में मिलावट करने का कार्य जोरों से चल रहा है,,,, 🙄🙄🙄आने वाले 20 साल बाद हमारी अगली पीढ़ियां ये #मिलावटी वेद, पुराण, उपनिषद पढ़ेंगे। जिसमें लिखा होगा चरित्र निर्माण बेकार की बात है🦹ब्रह्मचर्य एकदम फालतू जैसा टॉपिक है ।🦹धर्म और अधर्म जैसी कोई चीज नहीं ।🦹चार्वाक जैसी नीतियां अत्यंत लाभकारी है ,,,🦹संस्कार जैसी कोई चीज नहीं होती ।आदि आदि फालतू बातें मिलेंगी ,,,, यह सब बाकायदा अच्छी और सुद्रढ संस्कृत में मिलेंगीबिल्कुल उसी प्रकार जिस प्रकार मैकाले और मैक्स मूलर ने हमारी मनुस्मृति आदि को मिलावट करके दूषित किया। आपका अपना साथी विपिन सनातनी हिन्दू राष्ट्र संघ एक कदम सनातन की ओर हिन्दू राष्ट्र की पुनः स्थापना की एक पहल अखण्ड हिन्दुस्तान’

हिंदू राष्ट्र संघ या फेसबुक पेजवरील सदरील पोस्ट तब्बल हजारहून अधिक लोकांनी शेअर केलीय.

देखो और ध्यान दो और क्या हो रहा है हमारे देश में 🤔🤨🤨🤨🤨🤨हमारे धर्म ग्रंथों में मिलावट करने का कार्य जोरों से चल रहा…

Posted by हिन्दू राष्ट्र संघ on Thursday, 20 August 2020

अर्काइव्ह लिंक

एक कोटी भाजप समर्थक, मंत्र साधना अशा नावांच्या काही फेसबुक पेजवरूनही सादर पोस्ट शेअर झालेली आहे.

ट्विटर युजर्स सुद्धा या पोस्ट व्हायरल करण्यात आपलं योगदान देताहेत..

पडताळणी:

चेकपोस्ट मराठीने सर्वात आधी व्हायरल पोस्टमधील इमेज रिव्हर्स सर्च करून पाहिली असता ‘द हिंदू’ची २ एप्रिल २०१४ रोजी पब्लिश झालेली एक बातमी समोर आली. त्या बातमीमध्ये सदर फोटो वापरण्यात आला होता.

बातमीत वापरलेल्या फोटोखाली ‘Students at Al Mahadul Aali Al Islami studying the Vedas to understand the common attributes in Islam and Hinduism. This seminary has more than 1000 books on other religions at Hyderabad. PHOTO: G_RAMAKRISHNA  ‘ असे इंग्रजीत कॅप्शन आहे.

हिंदू आणि इस्लाम धर्मातील समान शिकवण समजून घेण्यासाठी वेदांचा अभ्यास करणारे ‘अल महादुल अली अल इस्लामी’चे विद्यार्थी (Muslim youth Hindu Vedas). हैदराबादमध्ये झालेल्या या सेमिनारमध्ये तब्बल एक हजारहून अधिक धार्मिक पुस्तकांचा समावेश होता. सदर फोटो ‘जी. रामकृष्ण’ यांनी क्लिक केलेला आहे.’ अशी माहिती त्या कॅप्शन मधून समजते. विद्यार्थ्यांनी आधुनिक विज्ञानासह धार्मिक बाबींचाही अभ्यास करावा यासाठी उचलण्यात आलेले हे पाउल असल्याचे बातमीत लिहिलेले आहे.

Muslim students studying other religions The hindu news
Source: The Hindu

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये मुस्लीम युवक हिंदू वेद-उपनिषदांत छेडछाड करत असल्याचे सांगत व्हायरल होत असलेल्या पोस्ट फेक सिद्ध झाल्या. सदर फोटो ‘द हिंदू’च्या २०१४ सालच्या बातमीमधील आहे. हे विद्यार्थी असून हैदराबादमध्ये आयोजित केलेल्या सेमिनारमध्ये विविध धर्मांचा अभ्यास करत आहेत.

हेही वाचा: डेन्मार्कने मुस्लीम समुदायाकडून मतदानाचा हक्क काढून घेतला?

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »

3 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा