Press "Enter" to skip to content

स्वतःस ब्राह्मण म्हणवणाऱ्या राहुल गांधींची आजी मासे खातानाचा दुर्मिळ फोटो? वाचा सत्य!

सोशल मीडियावर माजी पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांचा फोटो व्हायरल होतोय. दावा केला जातोय की फोटोमध्ये इंदिरा गांधी मासे खाताहेत.

Advertisement

दत्तात्रेय ब्राह्मण राहुल गांधी की दादी #Sea_food  का आनंद उठाते हुए !! अशा कॅप्शनसह पोस्ट करण्यात आलेला हा फोटो १३०० पेक्षा अधिक युजर्सकडून रिट्विट करण्यात आलाय.

अर्काइव्ह

हाच फोटो फेसबुकवर देखील शेअर केला जातोय.

पडताळणी:

व्हायरल फोटो रिव्हर्स सर्चच्या मदतीने शोधला असता ‘द हिंदू’च्या वेबसाईटवर २५ सप्टेंबर २०१७ रोजी प्रकाशित बातमीमध्ये हा फोटो बघायला मिळाला.

Source: The Hindu

प्रख्यात फोटोग्राफर श्रीधर नायडू (Sridhar Naidu) यांच्या निधनाच्या बातमीमध्ये नायडू यांनी घेतलेला इंदिरा गांधी यांचा फोटो वापरण्यात आला होता. फोटोच्या कॅप्शनुसार सदर फोटोमध्ये इंदिरा मक्याचे कणीस खाताहेत.

Source: The Hindu

बातमीनुसार श्रीधर नायडू यांनी इंदिरा गांधी यांचे अनेक दुर्मिळ फोटो घेतले होते. सध्या व्हायरल होत असलेला फोटो नायडू यांनी इंदिरा गांधी फतेह मैदान क्लबमध्ये (fateh maidan club) कणीस खात असताना घेतला होता.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावरील इंदिरा गांधी यांच्या व्हायरल फोटोसोबत केले जाणारे दावे चुकीचे आहेत. व्हायरल फोटोतील दाव्यांप्रमाणे इंदिरा गांधी मासे नाही, तर मक्याचे कणीस खात आहेत.

प्रख्यात फोटोग्राफर श्रीधर नायडू यांनी फतेह मैदान क्लबमध्ये इंदिरा गांधी यांचा मक्याचे कणीस खात असतानाचा दुर्मिळ फोटो घेतला होता.

हेही वाचा- इंदिरा गांधी यांच्या पतीचे नाव ‘फिरोज गांधी’ नव्हे ‘फिरोज खान’ होते? वाचा सत्य!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)

More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा