Press "Enter" to skip to content

गोरखनाथ मंदिरावरील हल्ल्यातील आरोपीचा म्हणून व्हायरल होतोय चित्रपट निर्माते विनोद कापडींचा फोटो!

उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील गोरखनाथ मंदिराबाहेर तैनात असलेल्या पोलिसांवर हल्ला करणारा अहमद मुर्तझा अब्बासी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. गोरखपूर येथील न्यायालयाने त्याची पोलीस कोठडी 16 एप्रिल पर्यंत वाढविली आहे. अब्बासी याने 3 एप्रिल रोजी जबरदस्तीने गोरखनाथ मंदिरात घुसण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला असता त्याने धारदार शस्त्रांनी पोलिसांवर हल्ला केला होता. या घटनेत 2 पोलीस जखमी झाले होते.

Advertisement

आता सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होतोय. या फोटोमध्ये आम आदमी पक्षाचे नेते आणि राज्यसभा सदस्य संजय सिंह, आमदार सौरभ भारद्वाज, पत्रकार आशुतोष, अजित अंजुम आणि साक्षी जोशी दिसताहेत. फोटोमध्ये अजून एक व्यक्ती देखील बघायला मिळतेय. ही व्यक्ती गोरखनाथ मंदिरावरील हल्ल्याचा आरोपी अहमद मुर्तझा अब्बासी असल्याचे सांगण्यात येतेय.

अर्काइव्ह

पडताळणी:

व्हायरल फोटो रिव्हर्स सर्चच्या साहाय्याने शोधला असता एका ट्विटर युजरने 5 एप्रिल रोजी केलेल्या ट्विटमध्ये हा फोटो आढळून आला. या ट्विटचे कॅप्शन आहे “खरा गोदी मीडिया असा दिसतो”

याआधारे पत्रकार अजित अंजुम (Ajit Anjum) यांच्या फेसबुक टाईमलाईनवरील एका पोस्टमध्ये व्हायरल फोटोमधील व्यक्ती बघायला मिळाली. यानुसार फोटोत दिसणारी व्यक्ती जेष्ठ पत्रकार आणि चित्रपट निर्माते विनोद कापडी (Vinod Kapri) असल्याचे स्पष्ट झाले. विनोद कापडी हे राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट निर्माते आहेत. शिवाय ते फोटोत दिसणाऱ्या पत्रकार साक्षी जोशी (Sakshi Joshi) यांचे पती देखील आहेत.

विनोद कापडी यांची ट्विटर प्रोफाइल शोधली असता त्यांनी देखील 8 एप्रिल रोजी आपल्या अधिकृत अकाऊंटवरून अजित अंजुम यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारी पोस्ट केली असल्याचे बघायला मिळाले.

साधारणतः महिनाभरापूर्वी भारतीय सैन्यात भरती होण्यासाठी जीवापाड मेहनत घेणाऱ्या प्रदीप मेहरा या विद्यार्थ्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ कापडी यांनीच शूट केला होता.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावर गोरखनाथ मंदिरावरील हल्ल्यातील आरोपीचा म्हणून चित्रपट निर्माते विनोद कापडींचा फोटो व्हायरल होतोय. या फोटोच्या आधारे आपचे नेते आणि इतर स्वतंत्र पत्रकारांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय.

हेही वाचा- दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी पंतप्रधान सहाय्यता निधीकरिता दिला २०० कोटीचा चेक? वाचा सत्य!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)

More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा