Press "Enter" to skip to content

भगवंत मान आणि अरविंद केजरीवाल यांच्या दारू पार्टीचा व्हायरल फोटो फेक! वाचा सत्य!

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या कथित दारू पार्टीचा फोटो सोशल मीडियात व्हायरल होतोय. दारूची बाटली, भरलेले ग्लास त्यांच्या पुढ्यात दिसतायेत. ‘उडता पंजाब के साथ झुमती दिल्ली’ अशा कॅप्शनसह हा फोटो शेअर केला जातोय.

Advertisement
Bhagwant Mann and Kejriwal liquor party viral pic
Source: Whatsapp

व्हॉट्सऍप आणि फेसबुकवरही हेच दावे व्हायरल होतायेत. ‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक पांडुरंग बढे यांनी सदर दावे निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली.

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल फोटो गुगल लेन्सच्या मदतीने रिव्हर्स सर्च करून पाहिला असता टाईम्स ऑफ इंडियाची बातमी बघायला मिळाली.

२०२१ साली आम आदमी पक्षाने ‘ऑटो संवाद’ अशी एक मोहीम काढली होती. यातून ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालकांशी संवाद साधला जात असे. याच दरम्यान दिलीपकुमार तिवारी या ऑटो रिक्षा चालकाने अरविंद केजरीवाल यांना आपल्या घरी जेवणाचे निमंत्रण दिले होते.

दिलीपकुमार यांची इच्छा पूर्ण करत अरविंद केजरीवाल, भगवंत मान आणि हरपाल सिंह चिमा हे तिघे दिलीप यांच्या लुधियाना येथील घरी जेवणासाठी गेले होते. त्याच वेळचा हा फोटो आहे. टाईम्स ऑफ इंडियाने याविषयी ट्विट करत जेवतानाचा व्हिडीओ शेअर केला होता.

व्हिडीओ-फोटो आपण व्यवस्थित पाहिलात तर लक्षात येईल की यामध्ये कुठेही दारूचे ग्लास नाहीत किंवा बाटलीही नाही. मूळ फोटोशी छेडछाड करून त्यामध्ये दारूची बाटली चिपकवण्यात आली आहे.

Comparioson of original and viral pic of boozing bhagwant maan and arvind kejriwal

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की अरविंद केजरीवाल आणि भगवंत मान दारू पीत असल्याचे दर्शविणारा व्हायरल फोटो फेक आहे. जेवण करतानाचा मूळ फोटो एडीट करून त्यात दारूची बाटली आणि ग्लास टाकले आहेत. मूळ फोटो २०२१ सालचा आहे.

हेही वाचा: भगवंत मान यांना गाडीचोरीच्या आरोपात अटक झाली होती? वाचा व्हायरल फोटोचे सत्य!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)

More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा