Press "Enter" to skip to content

जमावाने जाळले ‘खान इलेक्ट्रिकल्स’ दुकान, ‘ऑप इंडिया’चा मुस्लिमांकडून हिंदू मालमत्तांच्या जाळपोळीचा दावा!

उजव्या विचारधारेशी संबंधित वेबसाईट ‘ऑप इंडिया’ने 15 नोव्हेंबर 2021 रोजी अमरावती येथील हिंसाचारासंबंधीची (Amravati Violence) बातमी प्रसिद्ध केलीये. या बातमीमध्ये स्थानिक भाजप नेत्यांच्या हवाल्याने मुस्लिम जमावाने हिंदूंच्या मालमत्तांवर दगडफेक आणि तलवारीने हल्ला केल्याचा दावा करण्यात आलाय. बातमीची फिचर इमेज म्हणून जाळपोळीच्या घटनेचा फोटो देखील वापरण्यात आलाय.

Advertisement

अर्काइव्ह

पडताळणी:

अमरावतीमधील हिंसाचारासंबंधीच्या (Amravati Violence) बातमीत वापरण्यात आलेला फोटो रिव्हर्स सर्चच्या मदतीने शोधला असता वेगवेगळ्या वेबसाईटवरील बातम्यांमध्ये सदर फोटो वापरण्यात आला असल्याचे बघायला मिळाले.

हिंदुस्तान टाईम्सच्या वेबसाईटवरील बातमीनुसार फोटो अमरावतीमधील आहे. भाजपने पुकारलेल्या अमरावती बंद दरम्यानचा हा फोटो असल्याची माहिती फोटोच्या कॅप्शनमध्ये देण्यात आली आहे. फोटोमध्ये ज्या दुकानात जाळपोळ करण्यात आलेली दिसतेय, त्यावर दुकानावर स्पष्टपणे ‘खान इलेक्ट्रिकल्स’चा बोर्ड बघायला मिळतोय.

Source: Hindustan Times

रझा अकादमीसह (Raza Academy) मुस्लिम संघटनांनी पुकारलेल्या बंदच्या निषेधार्थ भाजपने शनिवारी अमरावतीत बंद पुकारला होता. महाराष्ट्राचे माजी कृषिमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते अनिल बोंडे, अमरावतीचे महापौर चेतन गावंडे आणि जिल्हा भाजप प्रमुख निवेदिता चौधरी यांच्यासह 14 जणांना सोमवारी अटक करण्यात आली.

‘द क्विन्ट’च्या बातमीमध्ये वापरण्यात आलेला फोटो अधिक स्पष्ट आहे. यातही दुकानावर ‘खान इलेक्ट्रिकल्स’चा बोर्ड बघायला मिळतोय.

Source: The

‘खान इलेक्ट्रिकल्स’चे मालक शादाब खान डबडबलेल्या डोळ्यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना सांगतात,

“कोविड-19 मुळे व्यवसायावर वाईट परिणाम झाला होता. आता दुकानाच्या जाळपोळीत 13 लाखांचे नुकसान झाले. आयुष्यभराच्या कमाईवर पाणी फेरले गेले. हिंसक जमावाने दुकानातल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू देखील चोरल्या”

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की उजव्या विचारधारेशी संबंधित वेबसाईट ‘ऑप इंडिया’ने अमरावतीमध्ये मुस्लिमांकडून हिंदूंच्या मालमत्तांवर हल्ले केले गेल्याच्या दाव्यासाठी वापरण्यात आलेल्या फोटोमधील दुकान हे एका मुस्लिम व्यक्तीचे आहे. ‘खान इलेक्ट्रिकल्स’ नावाच्या दुकानाचे मालक शादाब खान यांचे या जाळपोळीत मोठे नुकसान झाले आहे.

हेही वाचा- ममता बॅनर्जी यांनी पोलिसांकडून नमाजसाठी मशिदीची साफसफाई करून घेतली?

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »
More from फॅक्ट फाईल्सMore posts in फॅक्ट फाईल्स »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा