Press "Enter" to skip to content

भाजप राजवटीतीलच हिंसक मुलींच्या जमावाचा फोटो ‘काँग्रेस का कश्मीर’ म्हणून व्हायरल!

सोशल मीडियावर दोन वेगवेगळे फोटोज शेअर केले जाताहेत. पहिल्या फोटोत अनेक मुलींचा जमाव दिसतोय. हा जमाव दगडफेक करत असल्याचं दिसतंय. काही मुली निदर्शनं करताना दिसताहेत. ‘काँग्रेस का कश्मीर’ म्हणून हा फोटो शेअर केला जातोय.

Advertisement

दुसऱ्या फोटोत अतिशय आनंदात असणाऱ्या मुलींचा घोळका दिसतोय. त्यांच्या हातात राष्ट्रध्वज तिरंगा बघायला मिळतोय. दावा केला जातोय की दोन्हीही फोटो काश्मीरमधलेच असून पहिला फोटो काँग्रेस सरकारच्या कार्यकाळातील आहे, तर दुसरा फोटो भाजप राजवटीतील आहे.

काँग्रेस सरकारच्या काळातील अतिशय भीषण झालेला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न भाजप सत्तेत आल्यानंतर निकाली निघाला असून काँग्रेस सरकारच्या काळात रस्त्यावर उतरून दगडफेक करणाऱ्या मुलींच्या आयुष्याचा कायापालट झाला असल्याचं चित्र उभं करण्याचा प्रयत्न या दोन्ही फोटोच्या माध्यमातून केला जातोय. 

भाजपचे मीडिया पॅनलिस्ट ओ.पी.मिश्रा यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून हा फोटो शेअर केलाय.

अर्काइव्ह

  • पहिला फोटो

व्हायरल फोटो रिव्हर्स इमेजच्या साहाय्याने शोधला असता आम्हाला ‘वाशिंग्टन पोस्ट’च्या वेबसाईटवर २९ एप्रिल २०१७ रोजी प्रकाशित लेखामध्ये हा फोटो आढळून आला. फोटोचे क्रेडिट्स फारुख खान/युरोपिअन प्रेसफोटो यांना देण्यात आले आहे.

युरोपिअन प्रेसफोटोच्या वेबसाईटवरील माहितीनुसार फोटो २४ एप्रिल २०१७ रोजी घेण्यात आलेला आहे. काश्मीरची उन्हाळी राजधानी श्रीनगरमध्ये पोलिसांबरोबरच्या संघर्षांत काश्मिरी विद्यार्थिनींनी पोलिसांवर दगडफेक केल्याची माहिती फोटोच्या कॅप्शनमध्ये देण्यात आली आहे.

Source: European Press Photo

श्रीनगरमध्ये २०१७ साली ही घटना घडली फोटो. त्यावेळी काश्मीरमध्ये मेहबुबा मुफ्ती यांची पीडीपी आणि भाजप युतीचं सरकार होतं. मेहबुबा मुफ्ती या जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री होत्या.

  • दुसरा फोटो

दुसरा फोटो आम्हाला ‘जम्मू काश्मीर स्टडी सेंटर’ या स्वयंसेवी संस्थेच्या फेसबुक पेजवरून २६ जानेवारी २०२१ रोजी शेअर करण्यात आला असल्याचे आढळून आले.

Republic Day Celebrations in the Valley

Posted by Jammu Kashmir Study Centre – JKSC UK on Tuesday, 26 January 2021

फेसबुक पोस्टच्या कॅप्शननुसार हा फोटो प्रजासत्ताक दिन समारंभातील असल्याचे सांगण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीची खातरजमा करण्यासाठी आम्ही संस्थेशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, परंतु हा संपर्क होऊ शकला नाही.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की काश्मीर खोऱ्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचे भयावह चित्र दाखवण्यासाठी ‘काँग्रेस का कश्मीर’ म्हणून शेअर केला जात असलेला फोटो काँग्रेसच्या नाही तर भाजपच्या राजवटीतील आहे.

व्हायरल फोटो २०१७ मधील श्रीनगर येथील घटनेचा आहे. त्यावेळी जम्मू काश्मीरमध्ये पीडीपी-भाजप युतीचे सरकार सत्तेत होते.

हेही वाचा- ‘अमूल’ने ‘थुक जिहाद’मुळे १ लाख ३८ हजार मुस्लिम कर्मचाऱ्यांना काढून टाकले? वाचा सत्य!

More from राजकारणMore posts in राजकारण »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा