Press "Enter" to skip to content

‘सिरिया’तील लहान मुलांच्या मृतदेहांना भारतीय म्हणत पसरवल्या जात आहेत अफवा!

लहान मुलांचे मृतदेह असणाऱ्या फोटोला ऑडीओ जोडून तयार केलेली क्लिप व्हॉट्सऍपवर व्हायरल होतेय. सोबतच चाईल्ड ट्राफिकींग (child trafficking) करणारी टोळी सक्रीय झाल्याने सावध राहण्याचं आवाहन केलं जातंय.

Advertisement

 “तमिलनाडू पुलिस को एक कंटेनर से बच्चों की लाश मिली, इन बच्चों के जिस्म के अन्दर का हिस्सा निकाला गया है, जैसे किडनी, लीवर। तमिलनाडू पुलिस ने बताया इन सारे बच्चों को अलग अलग देशों से किडनैप करके लाया गया है ..

नोट:-अपने घर के बच्चों को सम्भालो, उनका ख्याल रखो, अपने सारे ग्रुप मे ये मैसेज सेन्ड करो। इस फोटो को इतना फैलाओ ताकि कुत्ता पकड़ा जाना चाहिए। अगर जिसने ये नहीं फैलाया वो अपनी माँ का सपूत नहीं। अपने फोन में चाहे कितने भी ग्रुप हो 1, 2 , 3, 4 या 25, ये सारे ग्रुप मे भेजो, हरामखोर पकड़ा जाना चाहिए।”

असा मेसेज असणाऱ्या त्या ऑडीओसोबत एक फोटो जोडलाय ज्यामध्ये अनेक लहान मुलं मृत अवस्थेत पहुडलेले दिसताहेत.

whatsapp screenshot with video claiming dead bodies of childrens from tamilnadu
Source: Whatsapp

व्हॉट्सऍप ग्रुपवर शेअर होऊन आलेली ही क्लिप आमच्या निदर्शनास आल्यानंतर ‘चेकपोस्ट मराठी’च्या माध्यमातून फॅक्टचेक करण्यास सुरुवात झाली.

पडताळणी:

सर्वात आधी आम्ही त्यात दिसणारा फोटो बाजूला काढून गुगलच्या रिव्हर्स इमेज सर्चच्या मदतीने शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्या सर्चमध्ये ही क्लिप २०१८ पासून विविध समाज माध्यमांतून व्हायरल होत असल्याचे समजले.

असेच लहान मुलांच्या तस्करीचे (child trafficking)चे दावे २०१८-१९च्या काळात थायलंडमध्ये सुद्धा केले जात होते.

child trafficking fake post from thailand

आम्ही जेव्हा गुगल ईमेज सर्च मध्ये अधिकाधिक मागच्या तारखेची लिंक शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा २०१३-१४च्या काळात पब्लिश झालेल्या ब्लॉगची लिंक मिळाली.

‘अरेबिक’ भाषेत असणाऱ्या या ब्लॉगवरील माहिती आम्ही ट्रान्सलेट केली तेव्हा समजलं की हा फोटो ‘सिरीयन सिव्हील वॉर’ मध्ये झालेल्या केमिकल ऍटॅकमधील मृत पावलेल्या लहान मुलांचा आहे.

या ब्लॉगवर सुरुवातीला ऍटॅकच्या आधी हसत्या खेळत्या मुलांचे फोटोज अपलोड केले आहेत आणि त्यानंतर पुढे अतिशय दाहक, मन हेलावणारे मृत बालकांचे फोटोजसुद्धा टाकलेले आहेत. त्यांपैकीच हा एक फोटो.

२१ ऑगस्ट २०१३ रोजी सिरीयामध्ये झालेल्या केमिकल ऍटॅकला ‘Ghouta Chemical Attack’ म्हणूनही ओळखले जाते. ‘अल जझीरा’वरील लेखानुसार या हल्ल्यात ११२७ लोक मृत्यमुखी पडले होते.

वस्तुस्थिती:

चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये व्हायरल दाव्यात फोटोसह फिरणाऱ्या ऑडीओचा आणि त्या फोटोचा काहीही संबंध नाही हे समोर आले. ज्या फोटोच्या आधारे दावे केले जात आहेत, तो तमिळनाडू किंवा भारतातील इतर कुठल्याही भागातील नसून तो ‘सिरीया’मधील आहे.

२०१८ मध्ये ‘बिझनेस स्टँडर्ड’ने दिलेल्या आकडेवारीनुसार लहान मुलांना किडनॅप (child trafficking) करणारी टोळी सक्रीय झाल्याच्या अफवेमुळे अवघ्या १८ महिन्यात ६९ मॉब लिंचिंगच्या घटना घडल्या. यात १८ जणांना आपले प्राण गमवावे लागले.

त्यामुळे अशी काही माहिती आपल्याकडे आल्यास फॉरवर्ड करण्याआधी कृपया ‘चेकपोस्ट मराठी’कडे पडताळून मगच पुढे पाठवा.

हेही वाचा: गॅस सिलिंडरला एक्सपायरी डेट नसते, व्हायरल माहिती चुकीची!

More from समाजकारणMore posts in समाजकारण »

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा