Press "Enter" to skip to content

योगी आदित्यनाथ यांच्यासोबत कानपुर शूटआउटच्या गँगस्टर विकास दुबेचा फोटो?

उत्तर प्रदेशातील कानपूर मधील गँगस्टर विकास दुबे ( Vikas Dubey ) आणि उत्तर प्रदेश पोलीसांमध्ये झालेल्या शूटआउट

Advertisement
मध्ये डीसीपी देवेंद्र मिश्र यांच्यासह ८ पोलीस अधिकाऱ्यांना आपला जीव गमवावा लागला.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिलेल्या माहितीनुसार या शूटआउटमध्ये ६ पोलीस अधिकारी १ होमगार्ड जवान जखमी झाले. शिवाय २ अपराध्यांना देखील मारण्यात आलं.

या घटनेनंतर लगेचच सोशल मिडीयावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि विकास दुबे नामक व्यक्तीचा फोटो व्हायरल व्हायला लागला. फोटोत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ज्या व्यक्तीसोबत दिसताहेत ती व्यक्ती ८ पोलीस अधिकाऱ्यांचा जीव घेणाऱ्या गँगचा प्रमुख विकास दुबे असल्याचा दावा करण्यात येतोय.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश युवक सचिव मोहसीन शेख यांनी हा फोटो शेअर केलाय. फोटोच्या कॅप्शनमध्ये म्हंटलंय, “यूपीमध्ये Dcp सहित 8 पोलिसांची गोळ्या घालून हत्या करणाऱ्या मुख्य आरोपी विकास दुबे सोबत मा. मुख्यमंत्री अजय बिष्ट उर्फ योगी आदित्यनाथ..!”

https://www.facebook.com/photo.php?fbid=3062889587079532&set=a.142340792467774&type=3&theater

पडताळणी:

 ‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल ‘गुगल रिव्हर्स इमेज’च्या सहाय्याने फोटोची पडताळणी केली, परंतु फोटोसंदर्भातील माहिती मिळाली नाही.

त्यानंतर आम्ही गुगल सर्चमध्ये गँगस्टर विकास दुबे ( Vikas Dubey ) विषयी माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आम्हाला ज्या बातम्या आणि त्यात वापरण्यात आलेले फोटोज मिळाले त्यावरून योगी आदित्यनाथ यांच्यासोबत फोटोत दिसणारी व्यक्ती गँगस्टर विकास दुबे नाही हे स्पष्ट झालं.

मग फोटोत योगी  आदित्यनाथ यांच्याबरोबर दिसणारी ‘विकास दुबे’ नामक व्यक्ती नेमकी कोण हे शोधण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी गुगलवर आम्हाला एक बातमी मिळाली. या बातमीवरून संबंधित व्यक्ती पंडित विकास दुबे असून भारतीय जनता युवा मोर्चा कानपूर बुंदेलखंडचे क्षेत्रीय अध्यक्ष असल्याचं समजलं.

बातमीची खात्री करून घेण्यासाठी आम्ही फेसबुकवर पंडित विकास दुबे या कीवर्डसह सर्च केल्यानंतर आम्हाला त्याच नावाने चालविण्यात येणारं फेसबुक पेज सापडलं.

फेसबुक पेजच्या कव्हर फोटोमध्ये विकास दुबे भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यासोबत दिसताहेत. शिवाय बायोमध्ये ते भारतीय जनता युवा मोर्चा कानपूर बुंदेलखंडचे क्षेत्रीय अध्यक्ष म्हणून कार्यरत असल्याचं देखील म्हंटलंय.

याच फेसबुक पेजवरून ‘हिंदी खबर’ या न्यूज चॅनेलवरील चर्चेत सहभागी होऊन आपण गँगस्टर विकास दुबे नसून भाजपचे नेते आहोत, हे स्पष्ट करणारा व्हिडीओ देखील मिळाला. यामध्ये ते आपल्या राजकीय कारकिर्दीविषयी सांगताहेत.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये हे स्पष्ट झालं आहे की योगी आदित्यनाथ यांच्याबरोबरच्या फोटोत दिसणारी ‘विकास दुबे’ ही व्यक्ती गँगस्टर विकास दुबे नसून भाजपचे नेते पंडित विकास दुबे आहेत.

पंडित विकास दुबे हे भारतीय जनता युवा मोर्चा कानपूर बुंदेलखंडचे क्षेत्रीय अध्यक्ष असून त्यांचा गँगस्टर विकास दुबेशी फक्त नाम  साधर्म्याइतकाच संबंध आहे. त्यांचा कानपूर शूटआउटशी संबंध नाही.

हेही वाचा: बुरखा घातलेल्या भाजपा कार्यकर्त्याला स्थानिकांनी पकडल्याची घटना खरी; पण…

More from राजकारणMore posts in राजकारण »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा