सोशल मीडियावर अमिताभ बच्चन यांचा एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. दावा करण्यात येतोय अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि अमिताभ बच्चन (amitabh with dawood) यांचा जूना फोटो रिलीज झाला आहे. या फोटोमुळेच जया बच्चन बॉलिवूड आणि ड्रग्ज विषयावर चिडल्या असल्याचं सांगितलं जातंय.
अमिताभ बच्चन यांनी सुशांत प्रकरणावर कुठलीही प्रतिक्रिया न दिल्याचा अनेक नेटकऱ्यांना राग आहे. हा राग यानिमित्ताने काढला जातोय. अमिताभ यांना गद्दार देखील म्हंटलं जातंय.
अनेक युजर्स “जाने, गद्दार पिग बी की बीबी क्यों बौखलाई ? रिश्ते में तो हम तुम्हारे बाप होते हैं, पर मैं आपका गुलाम हूँ..! दाऊद इब्राहिम और अमिताभ बच्चन की पुरानी तस्वीर अब रिलीज हो गई है, तभी जया बच्चन बॉलीवुड ड्रग्स कनेक्शन पर तिलमिला गई है.! Shame on Amitabh Bachhan.!” या कॅप्शनसह मोठ्या प्रमाणात हा फोटो शेअर करताहेत.
पडताळणी:
यांडेक्स रिव्हर्स सर्चच्या मदतीने हा फोटो शोधला असता ‘एक्स्ट्रामिरची’ या वेबसाईटवर आम्हाला व्हायरल होत असलेल्या फोटोशी मिळताजुळता फोटो मिळाला. पोर्टलवरील बातमीनुसार फोटो बांद्रा-वरळी सी-लिंकच्या उद्घाटना वेळचा आहे.
फोटो बांद्रा-वरळी सी-लिंकच्या उद्घाटनावेळचा असल्याचे समजल्यानंतर आम्ही या संदर्भातील किवर्डसच्या सहाय्याने हा फोटो शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ‘द हिंदू’च्या वेबसाईटवरती २७ मार्च २०१० रोजी प्रकाशित बातमीत हा फोटो वापरण्यात आल्याचे बघायला मिळाले.
बातमीत वापरण्यात आलेल्या फोटोच्या कॅप्शननुसार हा फोटो 24 मार्च 2010 रोजीच्या वांद्रे-वरळी सीलिंकच्या उद्घाटना वेळचाच आहे. मेगा स्टार अमिताभ बच्चन यांच्यासह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण असा स्पष्ट उल्लेख त्यात करण्यात आलेला आहे.
कार्यक्रमातील अमिताभ यांच्या उपस्थितीनंतर वाद निर्माण झाल्याने अशोक चव्हाण यांनी पुण्यातील मराठी साहित्य संमेलनात बिग बी बरोबर व्यासपीठ शेअर न करण्याचा निर्णय घेतला होता, असं देखील यात स्पष्ट करण्यात आलं आहे.
सोशल मीडियावर फोटो प्रमाणात व्हायरल व्हायला लागल्यानंतर अभिषेक बच्चनने देखील ट्विट करून या यासंर्भात स्पष्टीकरण दिलं होतं.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की अमिताभ बच्चन यांचा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासोबतचा १० वर्षांपूर्वीचा फोटो दाऊद इब्राहिम सोबतचा (amitabh with dawood) म्हणून शेअर करण्यात येतोय.
हे ही वाचा- कंगना राणावतसोबत दिसणारी व्यक्ती अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमचा भाऊ आहे?
Be First to Comment