Press "Enter" to skip to content

कंगना राणावतसोबत दिसणारी व्यक्ती अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमचा भाऊ आहे?

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत हिचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. दावा करण्यात येतोय की फोटोत कंगनासोबत दिसणारी व्यक्ती अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमचा भाऊ आहे. काही जण कंगनासोबतची व्यक्ती खुद्द अबू सालेम (kangana ranaut abu salem) असल्याचा देखील दावा करताहेत.

भांडूपचे माजी आमदार शिशिर शिंदे यांनी हा फोटो ट्विट केलाय. फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्यावर देखील हल्ला चढवलाय. शिशिर शिंदे लिहितात, “अरेरे?राज्यपाल महोदय,तुम्ही राजभवनावर पाहुणचार केलेली तुमची खास पाहुणी अबू सालेमच्या भावासोबत अशी नशा करायची? राजभवनची शान घालवली तुम्ही!म्हातारचळ म्हणतात याला,”

Advertisement

अर्काइव्ह पोस्ट

शिंदे यांचं हे ट्विट १२२ युजर्सकडून रिट्विट करण्यात आलंय. 

शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पॅरोडी अकाऊंटवरून देखील हा फोटो शेअर करण्यात आलाय. या फोटोत कंगना सोबत दिसणारी व्यक्ती खुद्द अबू सालेमच (kangana ranaut abu salem) असल्याचा दावा करण्यात आलाय.

अर्काइव्ह पोस्ट

सिनेक्षेत्राशी संबंधित लेखन करणाऱ्या अनिता पाध्ये आणि शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी देखील हा फोटो आपल्या फेसबुक अकाऊंटवरून शेअर केला होता.

Source: facebook
Source: Facebook

हाच फोटो याच दाव्यांसह व्हॉट्सऍपवर देखील फिरत असल्याचे ‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक राजेंद्र काळे यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

पडताळणी:

व्हायरल फोटोच्या पडताळणीसाठी आम्ही गुगल रिव्हर्स सर्चची मदत घेतली. आम्हाला ‘हफिंग्टन पोस्ट’च्या वेबसाईटवर १५ सप्टेंबर २०१७ रोजी म्हणजेच साधारणतः ३ वर्षांपूर्वी प्रकाशित लेख मिळाला.

Kangana Ranaut Should Realise She’s Too Talented To Milk Her Personal Life For Attention’ या हेडलाईनसह प्रकाशित लेख मार्क मॅन्युअल यांनी लिहिलेला आहे आणि फोटोत कंगनासोबत दिसणारी व्यक्ती देखील मार्क मॅन्युअल हेच आहेत.

kangna isn't with abu salem bro huffpost screenshot checkpost marathi
Source: Huffpost

मार्क मॅन्युअल यांनी लेखाची सुरुवातच ‘फोटो दिशाभूल करणारे असू शकतात’ या वाक्याने केलीये. जणू काही पुढच्या ३ वर्षांनी हा फोटो लोकांची कशा पद्धतीने दिशाभूल करेल, याची त्यांना कल्पनाच होती. मॅन्युअल पुढे लिहीतात की, मी काही कंगनाचा मित्र नाही किंवा चाहता देखील नाही. मी चांगल्या चित्रपटांचा प्रशंसक आहे आणि मला वाटतं की कंगना ही अतिशय उत्कृष्ट कलाकार आहे.

मार्क मॅन्युअल यांनी आपल्या फेसबुक आणि इंस्टाग्राम प्रोफाईलवरून देखील हा फोटो शेअर केला होता.

https://www.facebook.com/photo.php?fbid=10154846574080911&set=a.10152204137355911&type=3&theater

वस्तुस्थिती:

चेकपोस्ट मराठी‘च्या पडताळणीमध्ये हे स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोत कंगना राणावतसोबत दिसणारी व्यक्ती अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमचा भाऊ किंवा खुद्द अबू सालेम नाही. कंगना सोबत दिसणारी व्यक्ती मार्क मॅन्युअल हे असून ते गेल्या तीस वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत आहेत.

हे ही वाचा- शिवसेनेवरचा राग व्यक्त करण्यासाठी कंगनाने घेतला ‘फेकन्यूज’चा आधार!

More from राजकारणMore posts in राजकारण »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा