Press "Enter" to skip to content

संतप्त जमावाकडून भाजप खासदार हर्षवर्धन यांना मारहाण करण्यात आलीये?

संतप्त जमावाकडून एका व्यक्तीला बेदम मारहाण केली जात असतानाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. ज्यांना मारहाण केली जातेय ते भाजप खासदार आणि देशाचे आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन (dr. harsh vardhan attacked) असल्याचा दावा केला जातोय.

Advertisement

फेसबुक युजर सतीश देवकत्ते यांनी हा व्हिडीओ शेअर केलाय. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये ते म्हणतात, पहा आता जनता जागी झाली आहे….

दिल्लीत संतप्त शेतकर्यांकडून बिजेपी सांसद हर्षवर्धन यांची धुलाईने केली सुरुवात….

अन्याया विरोधात जर आवाज उठवला नाही तर आता नेत्यांची काही खैर नाही….

पहा आता जनता जागी झाली आहे…. दिल्लीत संतप्त शेतकर्यांकडून बिजेपी सांसद हर्षवर्धन यांची धुलाईने केली सुरुवात…. अन्याया विरोधात जर आवाज उठवला नाही तर आता नेत्यांची काही खैर नाही…. 🙄🙄 😂😂👇लिंक पण घ्याhttps://youtu.be/KO3sI1r5LP8

Posted by Satish Deokatte on Sunday, 4 October 2020

अर्काइव्ह पोस्ट

बातमी लिहीपर्यंत ७९ युजर्सकडून हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. साधारणतः अशाच कॅप्शनसह हा व्हिडीओ फेसबुक आणि व्हाट्सअपवर फिरतोय.

viral video to claim attack on Dr Harshvardhan on facebook
Source: Facebook

व्हाट्सअपवर व्हायरल होणारे दावे ‘चेकपोस्ट मराठीचे वाचक राजेंद्र भडके आणि दिग्विजय डुबल यांनी निदर्शनास आणून दिले.

पडताळणी:

व्हिडीओचे स्क्रिनशॉट्स घेऊन ते गुगल रिव्हर्स सर्चच्या मदतीने शोधले असता ANI या वृत्तसंस्थेच्या युट्यूब चॅनेलवर १९ ऑक्टोबर २०१६ रोजी अपलोड करण्यात आलेला एक व्हिडीओ मिळाला.

व्हिडिओच्या कॅप्शननुसार, “केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो आणि त्यांच्या ताफ्यावर पश्चिम बंगालच्या आसनसोल जिल्ह्यात मंगळवारी तृणमूल कॉंग्रेस (टीएमसी) समर्थकांनी हल्ला केल्याचा आरोप आहे. वाद-विवादा दरम्यान भाजप कार्यकर्त्याला देखील मारहाण केली गेली आणि त्याचे कपडे फाडण्यात आले. जमावाने पोलिस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दगडफेक केली आणि कार्यकर्त्यांना मारहाण केली.”

याच घटनेसंदर्भात २० ऑक्टोबर २०१६ रोजी एनडीटीव्हीच्या वेबसाईटवर देखील एक बातमी प्रकाशित झाल्याचे आम्हाला आढळून आले. या बातमीत बाबुल सुप्रियो यांच्या ताफ्यावरील हल्ल्याच्या हल्ल्याचा व्हिडीओ देखील आहे. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा याच व्हिडीओचा भाग असून व्हिडिओत ज्या व्यक्तीला मारहाण करण्यात येतेय ती व्यक्ती बंगाल भाजपचे नेते सुब्रत मिश्रा आहेत.

NDTV news to show attack on Babul Supriyo check post marathi
Source: NDTV

बातमीनुसार बाबूल सुप्रियो यांच्या आसनसोलचे मतदारसंघात चार लोकांना गाय चोरीच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्याविरोधात सुप्रियो आणि त्यांच्या समर्थकांनी तृणमूल काँग्रेसचे नेते आणि बंगाल सरकारमधील मंत्री मलय घटक यांच्या घराच्या बाहेर जाऊन घोषणाबाजी केली होती. याच दरम्यान भाजप-तृणमूल कार्यकर्त्यांमध्ये वाद होऊन सुप्रियो यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला होता.

हा व्हिडीओ केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्यावरील हल्ल्याचा म्हणून २०१६ साली देखील व्हायरल झाला होता. त्यावेळी स्वतः हर्षवर्धन यांनीच ट्विट करून व्हिडिओत दिसणारी व्यक्ती आपण नसल्याचे (dr. harsh vardhan attacked) स्पष्ट केले होते.

वस्तुस्थिती:

सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ जवळपास चार वर्षे जुना आहे. घटना पश्चिम बंगालमधील आसनसोल येथील असून व्हिडिओत जमावाकडून ज्या व्यक्तीला मारहाण करण्यात येतेय ती व्यक्ती भाजप खासदार डॉ. हर्षवर्धन नसून भाजपचे पश्चिम बंगालमधील नेते सुब्रत मिश्र आहेत. 

हे ही वाचा- मोदी आणि योगींसोबत हाथरस प्रकरणातील आरोपीचे वडील? वाचा सत्य!

More from राजकारणMore posts in राजकारण »

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा