Press "Enter" to skip to content

नरेंद्र मोदींनी स्वतः ‘छोट्या चोरापासून लुटेरा’ बनल्याची कबुली दिल्याचा व्हायरल व्हिडीओ एडीटेड!

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची एक व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होतेय. व्हिडिओ क्लिपमध्ये पंतप्रधान मोदी भाषण करताना दिसताहेत. या क्लीपच्या आधारे दावा केला जातोय की पंतप्रधान मोदींनी स्वतः जाहीर भाषणात आपण छोट्या चोरापासून लुटेरा बनल्याची कबुली दिली आहे.

Advertisement

भाषणात पंतप्रधान मोदी म्हणताहेत, “जब मै छोटी चोरी करता था, उस दिन अगर मेरी माँ ने रोका होता. तो मैं आज इतना बडा लुटेरा न बनता”

अर्काइव्ह

पडताळणी:

  • व्हायरल व्हिडीओ केवळ १० सेकंदांचा आहे. त्यामुळे व्हिडीओ पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) नेमके कुठल्या संदर्भाने आणि काय बोलताहेत हे शोधण्यासाठी आम्ही व्हायरल व्हिडिओच्या किफ्रेम्स रिव्हर्स सर्चच्या साहाय्याने शोधल्या.
  • आम्हाला बंगाल भाजपच्या (Bengal Bjp) अधिकृत युट्यूब चॅनेलवरून दि. १० एप्रिल २०२१ रोजी अपलोड करण्यात आलेला नरेंद्र मोदींच्या भाषणाचा व्हिडीओ मिळाला.
  • बंगाल विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यानच्या भाषणाचा हा व्हिडीओ आहे. सध्या व्हायरल होत असलेला १० सेकंदांचा व्हिडीओ याच भाषणातील आहे.
  • पंतप्रधान मोदींनी १० एप्रिल २०२१ रोजी बंगालमधील सिलिगुडी (Siliguri) येथे प्रचारसभा घेतली होती. या प्रचारसभेत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी बंगालला लुटले असल्याची टीका मोदींनी केली होती.
  • मोदी म्हणालेले की हे सगळं ममता दीदींच्या आशीर्वादाने सुरु आहे. दीदी म्हणतात की, “फक्त 100, 200, 500 रुपये घेतात. त्यात मोठी गोष्ट ती काय?
  • तृणमूलच्या कार्यकर्त्यांकडून आणि नेत्यांकडून केल्या जाणाऱ्या वसूलीची जबाबदारी कशा प्रकारे ममता दीदींची आहे हे पटवून देण्यासाठी पंतप्रधान मोदी भाषणात एक किस्सा सांगतात. मोदी म्हणतात,

“आम्ही लहान असताना एक गोष्ट ऐकलेली. त्या गोष्टीत एक खूप मोठा दरोडेखोर-लुटेरा होता. त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. शिक्षेची अंमलबजावणी करण्यापूर्वी त्याला त्याची शेवटची इच्छा विचारण्यात आली. त्यावेळी त्याने आपल्या आईला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. ज्यावेळी तो त्याच्या आईला भेटला, त्यावेळी त्याने आपल्याच हाताने आईचे नाक कापले.”

ज्यावेळी लोकांनी त्याला विचारले की तू असे का केले त्यावेळी तो दरोडेखोर म्हणाला,

“जब मै छोटी चोरी करता था, उस दिन अगर मेरी माँ ने रोका होता. तो मैं आज इतना बडा लुटेरा न बनता. मुझे फांसी पर जाने की नौबत नहीं आती”

भाषणाचा हा संदर्भ हे स्पष्ट करण्यासाठी पुरेसा आहे की सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ क्लिप चुकीच्या संदर्भाने चुकीच्या दाव्यांसह शेअर केली जातेय.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी “जब मै छोटी चोरी करता था, उस दिन अगर मेरी माँ ने रोका होता. तो मैं आज इतना बडा लुटेरा न बनता” हे असं विधान स्वतःच्या संदर्भात केलेलं नसून बंगाल विधानसभा प्रचारादरम्यानच्या एका भाषणात दरोडेखोराच्या संदर्भाने केलेलं आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ चुकीच्या दाव्यांसह शेअर केला जातोय.

हे ही वाचा- तुर्कीने नरेंद्र मोदींना जगातील ‘ग्रेट लीडर’ घोषित करत पोस्टाची तिकीटे छापली आहेत?

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता) 

More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा