Press "Enter" to skip to content

पाणीपुरीच्या पाण्यात लघवी मिसळणारा पाणीपुरी विक्रेता मुस्लिम असल्याचे दावे चुकीचे !

सोशल मीडियावर एका पाणीपुरी (Panipuri) विक्रेत्याचा व्हिडीओ व्हायरल होतोय. व्हिडिओमध्ये हा पाणीपुरी विक्रेता पाण्यामध्ये लघवी (Urine) मिसळत असताना बघायला मिळतोय. सोशल मीडियावर हा पाणीपुरी विक्रेता मुस्लिम असल्याचा दावा केला जातोय.

Advertisement

“पहले जग में पेशाब किया और वह पेशाब पीने वाले पानी में आधा डाला और आधा बाहर फेंक दिया ताकि ग्राहक को भी पता ना चले. बाहर खाने पीने के शौकीन लोगों इन जिहादियों का क्या करोगे” अशा कॉपी पेस्ट दाव्यांसह फेसबुकवर हा व्हिडीओ शेअर केला जातोय.

ट्विटरवर देखील हा व्हिडीओ शेअर केला जातोय. यात पाण्यात लघवी मिसळणाऱ्या इसमाचे नाव खलील भाई असल्याचं म्हंटलंय.

अर्काइव्ह

पडताळणी:

व्हिडीओ नेमका कधीच आणि कुठला आहे हे शोधण्यासाठी आम्ही गुगलवर किवर्ड सर्चची मदत घेतली. आम्हाला एबीपी माझा, लोकसत्ता, लोकमतच्या वेबसाईटवर या व्हिडीओ संदर्भातील बातम्या बघायला मिळाल्या.

जवळपास सर्वच या बातम्यांमधील माहितीनुसार व्हिडीओ गुवाहाटीमधील आठगांव चौकातील घटनेचा आहे. संबंधित पाणीपुरीवाल्याला पोलिसांनी अटक करण्यात आली असून त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. मात्र या बातम्यांमध्ये व्हिडिओतील व्यक्ती कोण आहे, याविषयीची माहिती मात्र या बातम्यांमध्ये नाही. व्हिडिओतील पाणीपुरी विक्रेत्याची माहिती मिळविण्यासाठी आम्ही अधिक शोध घेतला असता ‘आज तक’च्या वेबसाईटवर एक बातमी मिळाली.

‘आज तक’च्या बातमीनुसार संबंधित व्यक्तीचे नाव अक्रूल सहानी असे असून तो गुवाहाटीच्या भूतनाथ येथील रहिवासी आहे. व्हिडीओ गुवाहाटीतील भरालुमुख परिसरातील आहे.

Panipuri wala mixed urin in the water is not muslim_ checkpost marathi fact check
Source: Aaj Tak

ज्योती लहाना या भरालुमुख पोलीस स्टेशनच्या प्रमुख आहेत. त्यांनी ‘आज तक’शी बोलताना सांगितले की,

“आरोपी फेरीवाला मुस्लिम असल्याचा दावा खोटा आहे. ठेलेवाल्याचे नाव “अक्रूल सहानी” असून तो बिहारचा रहिवासी आहे. अक्रूल सहानी हा इसम मुस्लिम नसून तो हिंदुधर्मीय आहे” 

व्हिडीओ कुणी रेकॉर्ड केला ?

गुवाहाटीच्याच अमर ज्योती बोर्डोलोई यांनी हा व्हिडीओ रेकॉर्ड केला असून त्यांनी १४ ऑगस्ट रोजी आपल्या फेसबुक अकाऊंटवरून हा व्हिडीओ पोस्ट केला होता. अशा प्रकारच्या ठेलेवाल्यांपासून सावधान राहण्याचे आवाहन देखील त्यांनी केले होते. अमर यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने पाणीपुरीच्या (Panipuri) पाण्यात लघवी(Urine) मिसळल्याची गोष्ट खरी आहे. मात्र तो मुस्लिम असल्याचे दावे चुकीचे आहेत.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावरील सोशल मीडियावरील पाणीपुरीमध्ये लघवी मिसळणाऱ्या व्हायरल व्हिडिओतील पाणीपुरी विक्रेता मुस्लिम असल्याचे दावे पूर्णतः चुकीचे आहेत. घटना आसाममधील गुवाहाटी येथील आहे. व्हिडिओतील पाणीपुरी विक्रेत्याचे नाव अक्रूल सहानी  असून तो हिंदुधर्मीय आहे.

हेही वाचा- मुस्लीम महिलांनी दुबईत राम भजन गायले का? वाचा व्हायरल व्हिडीओचे सत्य!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता) 

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा