सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. व्हिडिओमध्ये मोठ्या प्रमाणातील लोकांची गर्दी बघायला मिळतेय. व्हिडीओ गुजरातच्या कच्छमधील दुधई गावातील असल्याचे सांगण्यात येतेय. दावा केला जातोय की ग्राम पंचायत निवडणुकीतील विजयानंतर तेथील ग्रामस्थांकडून कथितरित्या ‘पाकिस्तान जिंदाबाद’ची घोषणाबाजी करण्यात आली.
टीव्ही 9 गुजरातीने यासंदर्भातील बातमी देखील चालवली आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ अशाच प्रकारच्या दाव्यांसह व्हायरल होतोय.
फेसबुकवर देखील व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल आहे.
पडताळणी:
व्हायरल व्हिडीओविषयीची सत्यता पडताळण्यासाठी गुगलवर किवर्ड सर्च केलं असता आम्हाला इस्ट कच्छ भागाच्या पोलिस अधीक्षकांच्या ट्विटर हॅण्डलवररून करण्यात आलेले ट्विट मिळाले. या ट्विटमध्ये व्हायरल व्हिडीओ ट्विट करण्यात आलाय. शिवाय कॅप्शनमध्ये सांगण्यात आलेय की,
“निवडणुकीच्या विजजी रॅलीत “पाकिस्तान झिंदाबाद”ची घोषणाबाजी करण्यात आल्याचा खोटा दावा करणारा हा व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत आहे! व्हिडिओमधील जमावाने दिलेल्या माहितीनुसार व्हिडिओमध्ये दोनदा “राधुभाई झिंदाबाद” अश्या घोषणा देण्यात आल्या होत्या. राधुभाई हे रिनाबेन (विजयी सरपंच उमेदवाराच्या) पतीचे नाव आहे!”
आम्हाला इस्ट कच्छचे पोलीस अधीक्षक मयूर पाटील यांची अल्फा न्यूजला दिलेली प्रतिक्रिया देखील बघायला मिळाली. त्यात ते म्हणतात, “काल जे निवडणूक निकाल जाहीर झाले त्यात दुधई सरपंचपदाच्या निवडणुकीत रिनाबेन राधुभाई या महिला उमेदवार विजयी झाल्या. त्यांच्या विजयी रॅलीमध्ये एका व्यक्तीने दोन वेळा “राधुभाई झिंदाबाद” अश्या घोषणा दिल्या होत्या, जे रिनाबेन यांच्या पतीचं नाव आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियामध्ये ‘पाकिस्तान जिंदाबाद’ची घोषणाबाजी झाल्याच्या दाव्यासह व्हायरल करण्यात आला. हे पूर्णतः चुकीचं आहे.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये हे स्पष्ट झाले आहे की गुजरातच्या कच्छमधील दुधई गावात निवडणूक विजयानंतर ‘पाकिस्तान जिंदाबाद’ची घोषणाबाजी करण्यात आलेली नाही. व्हायरल व्हिडीओ चुकीच्या दाव्यांसह शेअर केला जातोय.
व्हिडिओमध्ये “राधुभाई झिंदाबाद” अशी घोषणाबाजी केली जात आहे. राधुभाई हे निवडणुकीत विजयी झालेल्या महिला उमेदवाराच्या पतीचे नाव आहे.
हेही वाचा- ‘हलाल’ म्हणून मुस्लीम स्वयंपाकी मिसळतात अन्नात थुंकी? उच्च न्यायालयात दिली कबुली?
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
Be First to Comment