Press "Enter" to skip to content

शेतकऱ्यांची बाजू घेणारं ते ट्विट ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या नीरज चोप्राचं नाही, वाचा सत्य!

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) भालाफेक या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक जिंकलेल्या नीरज चोप्राच्या (Neeraj Chopra) एका ट्विटचा स्क्रिनशॉट सोशल मीडियात व्हायरल होतोय. नीरजने या ट्विटमध्ये सरकारकडून शेतकऱ्यांवर अत्याचार केले जात असल्याने ऑलिम्पिकमधील सुवर्णपदकाला काहीही अर्थ उरत नसल्याचं म्हंटल्याचा दावा केला जातोय.

Advertisement

फेसबुक युजर नितीन पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून ‘आता असेल हिम्मत आणि 56″ इंच तर ह्या विषयावर फोन स्पीकर ऑन ठेऊन बोलाकी निरज चोप्रा सोबत !’ असे कॅप्शन लिहित त्या ट्विटचा स्क्रिनशॉट शेअर केलाय.

neeraj chopra pro farmer viral tweet shared on facebook_ checkpost marathi
Source: Facebook

‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक महेश पाटील यांनी सदर फेसबुक पोस्ट निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली.

पडताळणी:

  • ‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल ट्विटची पडताळणी करण्यासाठी ट्विटरवर नीरज चोप्राचे हँडल शोधले आणि तिथेच या व्हायरल ट्विटची पोलखोल झाली.
  • व्हायरल ट्विटमध्ये अकाऊंटचा युजर आयडी @neeraj_chopra_ असा आहे. परंतु नीरजच्या खऱ्या अकाऊंटचा युजर आयडी @Neeraj_chopra1 असा आहे. नीरजचा ‘N’ कॅपिटल अक्षरात आणि पुढे ‘१’ लावलेला आहे.
  • तसेच याहून महत्वाचे म्हणजे ट्विटरने नीरजच्या हँडलला ‘ब्ल्यू टीक’ देऊन अधिकृत अकाऊंट असल्याचे शिक्कामोर्तब केले आहे.
Source: Twitter

दरम्यान नीरजचे आजोबा धर्मवीर सिंह यांची आंदोलक शेतकऱ्यांचे नेते राकेश टिकैत यांची भेट घेतली. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या ऐकून घ्यायला हव्यात. नीरज शेतकरी आंदोलनात सहभागी होणार का, असा प्रश्न विचारल्यानंतर आंदोलनात आम्ही शेतकऱ्यांच्या सोबतच आहोत, पण आम्ही राजकारणात येऊ इच्छित नाही, असे त्यांनी सांगितले.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये नीरज चोप्राच्या नावे व्हायरल झालेले ट्विट फेक असल्याचे सिद्ध झाले. नीरजने गोल्ड मेडल मिळाल्यानंतर केवळ १ ट्विट केले आहे. त्यातही सुवर्णपदक मिळाल्याचा आनंद व्यक्त करत ऑलिम्पिकमधील फोटोज शेअर केले आहेत.

हेही वाचा: भाजप नेते ‘खेल रत्न’ पुरस्काराचे म्हणून फिरवत आहेत ‘परम वीर चक्र’ पुरस्काराचे मेडल!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता) 

More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा