मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यावर भर सभेत चप्पल भिरकावल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. (Shoe on Shivraj Singh Chauhan)
फेसबुक युजर दिशा यांनी सदर व्हिडीओ पोस्ट करून काय लिहिले आहे पहा.
‘मध्य प्रदेश!शिवराज मामांना चप्पल पडली आहे. (Shoe on Shivraj Singh Chauhan) कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न गंभीर आहे.आणि भक्तीणींच्या लाडक्या #ज्यो विरुद्ध, तेच आपले ज्योतिरादित्य सिंधिया ‘हाय हाय’ वगैरे घोषणा दिल्या आहेत!मीडियाला दिसतंय की नाही मध्य प्रदेशमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न किती गंभीर झाला आहे ते!’
हाच व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला जातोय. युजर अजय सिंह यांनी व्हिडीओ सोबत ‘चप्पल जुते से स्वागत होना शुरू हो गया है मामा शिवराज जी का अब समझ जाना चाहिए’ असा मजकूर लिहून ट्विट केले आहे.(Shoe on Shivraj Singh Chauhan)
पडताळणी:
‘चेकपोस्ट मराठी’च्या निदर्शनास जेव्हा हा व्हायरल व्हिडीओ आला तेव्हाच मनात शंका आली की हा ताजा असू शकत नाही. त्याचे कारण म्हणजे जर हा आताचा असता तर तोंडाला नाही तर किमान कानात आणि गळ्यात लटकलेले मास्क तरी दिसले असते. याच विचाराने आम्ही पडताळणीस सुरुवात केली.
गुगल सर्च मध्ये ‘Shoe on Shivraj Singh Chauhan’ या कीवर्ड्ससह सर्च केल्यानंतर आम्हाला काही बातम्या सापडल्या. या बात्म्यानुसार ही घटना ‘सप्टेंबर २०१८’ मधील आहे. सभेमध्ये जनतेला संबोधित करत असताना हा प्रकार घडलाय. बातम्यांनुसार चप्पल फेकणारे लोक सवर्ण असून ते SC/ST आरक्षण विरोधी मागण्या करत आहेत. टाईम्स ऑफ इंडिया, एनडीटीव्ही, एबीपी न्यूज यांसारख्या राष्ट्रीय न्यूज चॅनल्सने त्यावेळी बातम्या केल्या होत्या.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये हे सिद्ध झाले की सदरील (Shoe on Shivraj Singh Chauhan) व्हायरल व्हिडिओ आताचा नसून दोन वर्षे जुना आहे. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यावर चप्पल फेकणारे लोक SC/ST प्रवर्गांना मिळणाऱ्या सवलतीविरुद्ध आंदोलन करणारे सवर्ण असल्याचे अंदाज आहेत.
हेही वाचा: ‘गुजरात व्हेंटीलेटर ब्लास्ट आणि कंपनीचे मोदी सूटसोबत कनेक्शन?’ वाचा काही महत्वाचे ‘फॅक्ट्स’!
Be First to Comment