Press "Enter" to skip to content

योगी आदित्यनाथ यांच्या ताफ्याच्या विरोधाचा तीन वर्षांपूर्वीचा व्हिडीओ सध्याचा म्हणून व्हायरल !

शिवसेनेच्या चित्रपट सेनेचे सचिव बाला लोकरे यांनी फेसबुकवर एक व्हिडीओ शेअर केलाय. व्हिडीओमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या ताफ्याला मोठ्या प्रमाणात विरोध होताना बघायला मिळतोय. संतप्त तरुणांकडून योगी सरकार मुर्दाबादच्या घोषणा देताहेत. लोकरे यांच्या दाव्यानुसार उत्तर प्रदेशातील बेरोजगार तरुणांनी अदित्यनाथ यांचा ताफा अडवून (yogi adityanath convoy stopped) निषेध नोंदवला आहे. माध्यमांमध्ये मात्र ही बातमी बघायला मिळणार नाही. 

Advertisement

बेस्ट शिएम… ढोंगी अदित्यनाथ यांच्या ताफा अडवून बेरोजगार यूवकांनी निषेध केला भाडखाऊ मिडीया दाखवेल का ?? भक्तो उलटी गिनती शूरू… 😂🤣😂🤣

Posted by Bala Lokare on Friday, 11 September 2020

अर्काइव्ह पोस्ट

लोकरे यांची फेसुबक पोस्ट जवळपास १४०० युजर्सकडून शेअर करण्यात आली आहे. इतरही अनेक युजर्स हाच व्हिडीओ शेअर करताना दिसताहेत.

पडताळणी:

व्हिडिओच्या पडताळणीसाठी आम्ही ‘yogi adityanath convoy stopped’ या किवर्डसह युट्यूबवर हा व्हिडिओ शोधला. त्यावेळी हा व्हिडीओ ‘ADNEWS’ या युट्यूब चॅनेलवर ११ जून २०१७ रोजी अपलोड करण्यात आला असल्याचे आढळून आले.

यावरून ही घटना सध्याची नसून २०१७ सालची आहे, हे तर स्पष्ट झाले.

त्यानंतर घटनेच्या सविस्तर माहितीसाठी आम्ही गुगलवर सर्च केलं असता आम्हाला ‘पत्रिका’च्या वेबसाईटवर या घटनेविषयी बातमी वाचायला मिळाली.

बातमीनुसार लखनऊ विद्यापीठाच्या ‘हिंदवी स्वराज दिवस’ कार्यक्रमात सहभागी होऊन परतणाऱ्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवण्यात आले होते. विविध विद्यार्थी संघटनांच्या विद्यार्थ्यांनी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील उत्तर प्रदेश सरकार विरोधात घोषणाबाजी केली होती. 

उत्तर प्रदेश पोलिसांनी मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवल्या प्रकरणी ‘समाजवादी छात्र सभा’ ‘एफएसआई’ ‘आईसा’ आणि इतर संघटनांच्या १४ विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेतील गडबडीप्रकरणी ६ पोलिसांना देखील निलंबित करण्यात आलं होतं.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला योगी आदित्यनाथ यांच्या ताफ्याच्या विरोधाचा व्हिडीओ सध्याचा नसून जवळपास तीन वर्षांपूर्वीचा आहे.

हे ही वाचा- दुर्गा वाहिनी कार्यकर्तीच्या नावे जातीय तेढ निर्माण करणारी जुनी फेक पोस्ट होतेय नव्याने व्हायरल!

More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा