Press "Enter" to skip to content

‘जय श्रीराम’च्या नारेबाजीसह तरुणाच्या खूनाचा दावा करणारा व्हायरल व्हिडीओ उत्तर प्रदेशातील नाही!

सोशल मीडियात एक व्हिडीओ व्हायरल होतोय. व्हायरल व्हिडिओमध्ये दिवसा ढवळ्या, भर रस्त्यात दोन युवकांचा पोलिसांसमोर खून करण्यात येत असल्याचे बघायला मिळतेय. रस्त्यावरील गर्दी केवळ बघ्याच्या भूमिकेत आहे. एवढंच नव्हे तर गर्दीतून खुन्यासह ‘जय श्रीराम’ची नारेबाजी केली जातेय. सोशल मीडियात दावा केला जातोय की हा व्हिडीओ उत्तर प्रदेशातील आहे. अशी सत्ता आणि असे नेते हवे असतील तर BJP ला मदत करा, असे आवाहन केले जातेय.

Advertisement

जय श्रीराम च्या घोषणा देत UP मध्ये दोन युवकांचा खून… अशी सत्ता आणि नेते कोणाला हवे आहेत त्यांनी खुशाल bjp ला मदत करा..एकदिवस तुमची पिढी अशीच बरबाद होणार‘ अशा कॅप्शनसह ५७ सेकंदाचा तो व्हिडीओ शेअर केला जातोय.

UP youngsters killed two men by chanting jai shreeram viral video on FB
Source: Facebook

टीप: व्हिडीओतील दृश्ये विचलित करणारी असल्याने आम्ही तो व्हिडीओ व्हिडीओ किंवा त्याची लिंक देणे टाळत आहोत.

‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक शेखर वाघ आणि कैलास तोरणे यांनी सदर व्हिडीओ व्हॉट्सऍपवरही जोरदार व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आणून देत पडताळणीची विंनती केली.

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल दाव्यांच्या अनुषंगाने विविध कीवर्ड्सच्या आधारे गुगल सर्च केले असता सदर घटनेविषयी राष्ट्रीय माध्यमांत प्रकाशित झालेल्या बातम्या समोर आल्या.

सदर घटना उत्तर प्रदेशातील नाही:

माध्यमांनुसार सदर घटना बिहार मधील कैमुर जिल्ह्यातील आहे. ५ ऑक्टोबर २०१९ रोजी ‘आज तक’च्या वेबसाईटवर प्रसिद्ध बातमीनुसार भबुआ येथील वार्ड सदस्याच्या मुलाने एका युवकास गोळी मारली होती. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याचा बदला म्हणून काही जणांनी पोलिसांसमोरच आरोपीस मारले. त्याच घटनेचा हा व्हिडीओ.

पोलिसांनी आरोपीस दवाखान्यात दाखल केले. तिथेही त्याला जीवे मारण्यासाठी लोकांनी दवाखान्यात धुमाकूळ घातला. इमर्जन्सी गेट तोडले, खिडक्यांवर दगडफेक केली. परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांना लाठीमार देखील करावा लागला होता. शेवटी कैमुरचे एसपी दिलनवाज अहमद यांनी स्वतः जाऊन लोकांना शांततेचे आवाहन केले.

Aaj Tak news about mob lynching in bihar
Source: Aaj Tak

घटनेमागे धार्मिक कारण नाही:

व्हिडीओमध्ये ‘जय श्रीराम’च्या घोषणाबाजीसह युवकाच्या छातीवर लाथा बुक्क्यांचा प्रहार केला जात असल्याचे बघायला मिळतेय. त्यामुळे जखमी तरुण हिंदू-धर्मेतर आहे का हे शोधण्याचा प्रयत्न केला असता केला असता आम्हाला आरोपी विरोधात नोंदविण्यात आलेली FIR बघायला मिळाली.

एफआयआमध्ये सांगण्यात आले आहे की लोकांनी गोळी मारून घटनास्थळावरून पळून जाण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या आरोपीस पकडले आणि बेदम मारहाण केली. एफआयआरनुसार सदर तरुणाचे नाव साहिल राईन उर्फ भवानी राईन असे आहे. याचाच अर्थ घटनेतील सर्वच तरुण हिंदू होते.

Source: Bihar Govt

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की सोशल मीडियावरील व्हायरल दावे फेक आहेत. शिवाय व्हिडीओ आताचा नसून २०१९ सालचा आहे. तसेच व्हिडीओ उत्तर प्रदेश नव्हे, तर बिहारमधील आहे. या एकूण घटनेत कुठेही धार्मिक कारण नाही. ही घटना ‘मॉब लीन्चिंग’ची आहे. जमावाने गुन्हा करून पळून जात असलेल्या आरोपीस पकडून स्वतः कायदा हातात घेत मारहाण केलीय.

हेही वाचा: तमिळनाडूतील सैनिकाच्या आत्महत्येचा व्हिडीओ महाराष्ट्रातील शेतकऱ्याचा म्हणून व्हायरल!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)

More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा