Press "Enter" to skip to content

हिमा दास हिने राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याचे व्हायरल दावे चुकीचे!

ब्रिटनमधील बर्मिंगहॅममध्ये सध्या राष्ट्रकुल स्पर्धा पार पडताहेत. वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांमध्ये भारताला चांगले यश देखील मिळत आहे. अशात सोशल मीडियावर भारतीय धावपटू हिमा दास (Hima Das) हिने या स्पर्धांमध्ये सुवर्णपदक जिंकल्याचा दावा करणारा व्हिडीओ व्हायरल होतोय. हिमा दास हिने महिलांच्या 400 मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकत ऐतिहासिक कामगिरी नोंदविल्याचा दावा केला जातोय.

Advertisement

हिमा दास हिचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. माजी भारतीय क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) याने देखील हिमाचा फोटो ट्विट करत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल तिचे अभिनंदन केले होते. मात्र नंतर त्याने आपले ट्विट डिलीट केले.

अर्काइव्ह

दरम्यान, हिमा दास हिचा हा व्हिडीओ सध्याच्या राष्ट्रकुल स्पर्धेमधील नसून IAAF जागतिक अंडर-20 ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेतील असल्याची माहिती समोर आली आहे. ही स्पर्धा जुलै 2018 साली फिनलंडमध्ये पार पडली होती. हिमा दास हिने या स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकत अशा प्रकारची कामगिरी नोंदविणारी पहिली भारतीय महिला ठरण्याचा मान मिळविला होता.

वर्ल्ड ऍथलेटिक्सच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून 13 जुलै 2018 रोजी हा व्हिडीओ ट्विट करण्यात आला होता.

हिमा दास राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत आहे. हिमाकडून देशवासियांना सुवर्णपदकाच्या आशा देखील आहेत. मात्र ट्रॅक आणि फील्ड इव्हेंट्स अलेक्झांडर स्टेडियमवर आजपासून सुरु होणार आहेत. हिमा दास 4 ऑगस्ट रोजी 200 मीटर प्रकारात सहभागी होणार आहे. या स्पर्धेची उपांत्य आणि अंतिम फेरी 5 आणि 6 ऑगस्टला पार पडणार आहे.

हेही वाचा- आदिवासी महिला भारताची राष्ट्रपती झाल्यावर आरक्षण रद्द केले पाहिजे असे आंबेडकर म्हणाले होते का?

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)

More from समाजकारणMore posts in समाजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा