Press "Enter" to skip to content

कलम ३७० काय हटवले फारुख अब्दुल्ला भजन गाऊ लागले? वाचा व्हायरल व्हिडिओचे सत्य!

सोशल मीडियावर जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला (Farooq Abdullah) यांचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. व्हायरल व्हिडिओमध्ये फारुख अब्दुल्ला भजन गाताना दिसताहेत. दावा केला जातोय की हा व्हिडीओ जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटविल्यानंतरचा असून फारूक अब्दुल्ला यांच्यामध्ये झालेला आमूलाग्र बदल दाखवणारा आहे.

Advertisement

अर्काइव्ह

पडताळणी:

सर्वप्रथम किवर्डसच्या आधारे युट्यूबवर व्हायरल व्हिडीओचा शोध घेतला असता नलीन भट या युट्युब चॅनेलवरून साधारणतः 3 वर्षांपूर्वी अपलोड करण्यात आलेला 5 मिनिटांचा व्हिडीओ मिळाला. व्हिडिओमध्ये आसाराम बापू देखील बघायला मिळताहेत.

या आधारे गुगलवर किवर्ड सर्च केलं असता Satsangamrut या युट्यूब चॅनेलवरून 21 सप्टेंबर 2009 रोजी अपलोड करण्यात आलेला व्हिडीओ मिळाला.  Asaram Ji Bapu -Dr Farukh Abdulla ki prarthna अशा कॅप्शनसह हा व्हिडीओ अपलोड करण्यात आलेला आहे. व्हिडीओ 28 एप्रिल 2001 रोजीच्या जम्मू येथील सत्संगामधील असल्याची माहिती देखील देण्यात आली आहे.

फारुख अब्दुल्ला यांचा भजन गात असतानाचा हा एकमेव व्हिडीओ नाही. युट्यूबवर फारूक अब्दुल्लांचे अनेक व्हिडीओज उपलब्ध आहेत, ज्यात ते भजन गाताना बघायला मिळतात.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की फारुख अब्दुला यांचा भजन गात असतानाचा व्हायरल व्हिडीओ चुकीच्या दाव्यांसह शेअर केला जातोय. व्हिडिओचा कलम 370 हटविण्याशी काहीही संबंध नाही. व्हिडीओ साधारणतः 2009 पासून म्हणजेच कलम 370 हटविण्याच्या 9 वर्षांपूर्वी पासून इंटरनेटवर उपलब्ध आहे.

हेही वाचा‘रघुपती राघव राजा राम’ भजनातून ‘ईश्‍वर अल्‍लाह तेरो नाम’ काढून टाकण्यात आले आहे?

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती ‘ चेकपोस्ट मराठी’च्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »
More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा