Press "Enter" to skip to content

केरळमध्ये संघाच्या विरोधात मुस्लिमांनी काढलेल्या रॅलीचा म्हणून व्हायरल होतोय जुना व्हिडीओ!

‘संघ परिवाराच्या विरोधात केरळमध्ये मुसलमानांची रॅली आणि आम्ही भांडतोय पेट्रोल वरून. हिंदुनो जिवंत राहिलात तर पेट्रोल खरेदी कराल’ या अशा कॅप्शनसह २.२९ मिनिटांचा एक व्हिडीओ सोशल मीडियात जोरदार व्हायरल होतोय.

Advertisement

ट्विटरवर ‘केरल में संघ परिवार और राम मंदिर के विरुद्ध मुसलमानों की रैली ।और हम रोते रहेंगे पेट्रोल और तेल के भाव पर। अरे हिंदुओं बचोगे तो कुछ खरीदोगे न। मंहगाई तो बढ़ेगी घटेगी पहले अपना धर्म बचना चाहिए’ अशा कॅप्शनसह अनेकांनी सदर व्हिडीओ शेअर केलाय.

अर्काइव्ह

‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक किरण साळुंके, गोविंद भुजबळ, राजेंद्र काळे, दिनेश सूर्यवंशी आणि अल्ताफ शेख यांनी ट्विटर, फेसबुकसह व्हॉट्सऍपवरही हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली.

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल व्हिडीओच्या की फ्रेम्स रिव्हर्स सर्च करून पाहिल्या असता असे समजले की सदर व्हिडीओ आताचा नसून जानेवारी २०२० मधला आहे. केरळ येथील मन्नारक्कड लाइव्ह या युट्युब चॅनलवरून ३ जानेवारी २०२० रोजी याविषयीच्या बातमीचा व्हिडीओ अपलोड केलेला आहे.

हातात भारतीय तिरंगा ध्वज, मोर्चाच्या समोर असलेया बॅनरवर ‘Constitutional Protection Rally’ असे असलेला हा बातमीचा व्हिडीओ आणि व्हायरल व्हिडीओतील दृश्यांची तुलना करून पाहिली आणि दोन्ही घटना एकच असल्याचे लक्षात आले.

Kerala rally against CAA
Source: Youtube

बातमीची कॅप्शन मल्याळम भाषेत आहे त्यामुळे आम्ही गुगल ट्रान्सलेशनचा आधार घेतला असता असे समजले की हा मोर्चा ‘नागरिकत्व दुरुस्ती कायद्या’च्या विरोधात आहे. CAA-NRC विरोधात मागच्या वर्षी देशभरात केंद्राच्या निर्णयांविरुद्ध जोरदार आंदोलने झाली होती. त्यातीलच हे एक.

Source: Google Translate

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये हे स्पष्ट झाले की केरळमध्ये संघाच्या विरोधात मुस्लिमांनी रॅली काढल्याचे दाखवत देशभरातील हिंदू धोक्यात आहेत असे भासवणारा व्हिडीओ जुना असून संघ किंवा हिंदुच्या नव्हे तर ‘नागरिकत्व दुरुस्ती कायद्या’च्या विरोधातील आहे.

हेही वाचा: शिवसेनेचं हिंदुत्व झालं हिरवं? टिपू सुलतान जयंतीच्या पोस्टरवर बाळासाहेबांच्या खांद्यावरील शालही हिरवी?

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा