Press "Enter" to skip to content

लाऊडस्पीकरवरील अजान बंदीवरचा उपाय म्हणून मुस्लिमांनी सार्वजनिक रस्त्यावर सामूहिकरीत्या पढली नमाज?

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. व्हायरल व्हिडिओमध्ये मुस्लिम समाजातील काही लोक रस्त्यावर नमाज पढताना दिसताहेत. दावा केला जातोय की हा व्हिडीओ उत्तर प्रदेशातील असून राज्यातील मशिदींवरील लाऊडस्पीकर काढण्यात आल्यानंतर लाऊडस्पीकरवरील अजान बंदीवरचा उपाय म्हणून मुस्लिम समाजातील लोकांनी सार्वजनिक रस्त्यांवर सामूहिकरीत्या नमाज पठन करायला सुरुवात केली आहे.

Advertisement

सुदर्शन टीव्हीशी संबंधित अभय प्रताप सिंग यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केलाय.

अर्काइव्ह

सुदर्शन टीव्हीच्या ट्विटर हॅण्डलवरून देखील हा व्हिडीओ ट्विट करण्यात आला होता.

अर्काइव्ह

पडताळणी:

व्हायरल व्हिडिओच्या पडताळणीसाठी व्हिडीओ रिव्हर्स सर्चच्या मदतीने शोधला असता ‘वन इंडिया कन्नड’ या युट्यूब चॅनेलवरून 8 एप्रिल 2020 रोजी हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला असल्याचे बघायला मिळाले. यावरून एक गोष्ट स्पष्ट झाली ती म्हणजे हा व्हिडीओ सध्याचा नसून तो किमान दोन वर्षांपूर्वीचा आहे.

व्हिडिओच्या डिस्क्रिप्शननुसार, “भारतात लॉकडाऊन आहे, सर्व मंदिर-मशिदी बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मुस्लिमांना मशिदीत नमाज अदा करण्याची संधी मिळाली नाही, मग त्यांनी रस्त्यावर उभे राहून अल्लाहची प्रार्थना केली.”

व्हिडिओ संदर्भात अधिक माहिती मिळविण्यासाठी व्हिडिओ काळजीपूर्वक बघितला असता त्यामध्ये ‘शिमला बिर्याणी’ नावाच्या हॉटेलचा बोर्ड बघायला मिळाला. या माहितीच्या आधारे गुगलवर शोध घेतला असता झोमॅटोच्या वेबसाइटवर ‘न्यू शिमला बिर्याणी’ नावाच्या दुकानाचा फोटो बघायला मिळाला. हा फोटो व्हायरल व्हिडिओतील दृश्याशी जुळणारा आहे. हे दुकान जी. टी. रोड, पिलखाना, हावडा येथील आहे.

Shimla Biryani House is in Howrah
Source: Zomato/ One India

शिमला बिर्याणीच्या कर्मचाऱ्यांने ‘अल्ट न्यूज’ला दिलेल्या माहितीनुसार सदर व्हिडीओ पश्चिम बंगालमधील हावडा येथील असून तो व्हिडीओ लॉकडाऊन दरम्यानचा आहे.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओ चुकीच्या दाव्यांसह शेअर केला जातोय. व्हायरल व्हिडीओ दोन वर्षांपूर्वीचा असून त्याचा सध्याच्या लाऊडस्पिकरवरून नमाजबंदीशी काहीही संबंध नाही. शिवाय व्हिडीओ उत्तर प्रदेशातील नसून पश्चिम बंगालमधील हावडा येथील आहे.

हेही वाचा- नमाज पढताना ट्रेनच्या हॉर्नचा आवाज आल्याने रेल्वे स्टेशनची तोडफोड केल्याचे व्हायरल दावे फेक!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा