Press "Enter" to skip to content

व्हायरल व्हिडीओत गाड्यांवर हल्ले करणारे मुस्लिम नाहीत, ना ही ती बंगालची घटना! वाचा सत्य!

पश्चिम बंगाल मधल्या मुस्लीम समुदायाने रस्त्यावर रोजाचे उपवास सोडण्यासाठी ये जा करणाऱ्या गाड्यांवर हल्ला करत रस्ता रिकामा केला. पश्चिम बंगालचे हे चित्र संपूर्ण देशात दिसायला फार वेळ लागणार नाही. अशा प्रकारच्या दाव्यांसह एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

Advertisement

ये विडीयो कलकत्ता का है,
बंगाल में हालात एकदम पाकिस्तान जैसे बने हुए हैं,
और ये जो गाड़ियों
के शीशे तोड़ रहे हैं वो मुल्ले हैं, क्यूं कि इनको सड़क पर बैठ कर रोजे खोलने हैं,एसा पूरे देश में होने में देर नहीं है .70वर्षो में हिन्दू 8 राज्यों में अल्पसंख्यक होगये किसी को पता भी नहीं चला,,
अब सोचना पड़ेगा नहीं तो………?????????’
अशा कॅप्शनसह व्हिडीओ शेअर केला जातोय.

‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक डॉ. भारत पाटोळे, सुहास देशपांडे आणि वाघेश साळुंखे यांनी ट्विटर, फेसबुकप्रमाणेच व्हॉट्सऍपवरही हे दावे जोरदार व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली.

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल व्हिडीओच्या की फ्रेम्स यांडेक्स सर्च इंजिनवर रिव्हर्स सर्च करून पाहिल्या असता हाच व्हिडीओ २०१८ साली युट्युबवर अपलोड करण्यात आले असल्याचे बघायला मिळाले.

Source: Youtube

हाच धागा पकडत विविध कीवर्ड्सच्या आधारे गुगल सर्च केल्यानंतर ‘Chennel 4 News’ या इंग्लंडमधील वृत्तवाहिनीच्या ट्विटर हँडलवर सदर व्हिडीओशी संबंधित ट्विट बघायला मिळाले.

२०१८ साली ब्रिटनमध्ये मुस्लीम समुदायाने रस्त्यावरील कारवर हल्ले केल्याचे दावे व्हायरल झाले होते, हे दावे चुकीचे असून व्हायरल स्वित्झर्लंडमधील फुटबॉलप्रेमींनी मांडलेल्या हैदोसाचा हा व्हिडीओ असल्याचे ‘Chennel 4 News’ करून स्पष्ट करण्यात आले होते.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की व्हायरल दावे फेक आहेत. व्हिडीओत रस्त्यावरील गाड्यांवर हल्ले करणारा जमाव मुस्लीम तर नाहीच, परंतु हा व्हिडीओ पश्चिम बंगाल काय भारतातील इतर कुठल्या भागातील देखील नाही. सदर व्हिडीओ २०१८ सालचा स्वित्झर्लंड येथील आहे. हल्लेखोर फुटबॉलप्रेमी आहेत.

हेही वाचा: शीख तरुणाला मारहाणीचा व्हिडिओ पाकिस्तानातील नव्हे तर पंजाबमधील लुधियानाचा!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »
More from राजकारणMore posts in राजकारण »

One Comment

  1. Anonymous Anonymous April 1, 2022

    हे तर विरोधी सरकार बदनामी चा डाव. संघीय संघटनेचे कारस्थान. त्याला मिडियाचा साथ.

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा