Press "Enter" to skip to content

कचरा फेकण्यास नकार दिला म्हणून मुस्लिम युवकाचा हिंदू महिलांवर प्राणघातक हल्ला? वाचा सत्य!

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय. व्हायरल व्हिडिओमध्ये दोन गटांमध्ये हाणामारी होत असल्याचे बघायला मिळतेय. व्हिडीओ शेअर करताना दावा केला जातोय की ही घटना उत्तर प्रदेशातील मिर्जापूर येथील असून अब्दुल नामक मुस्लिम युवकाने कचरा फेकण्यास नकार दिल्यामुळे हिंदू परिवारातील महिलांवर प्राणघातक हल्ला केला. या व्हिडीओवरून दहशतवादाचा धर्म स्पष्टपणे कळतो, असेही यात म्हंटले आहे.

Advertisement

पडताळणी:

व्हायरल व्हिडिओच्या किफ्रेम्स रिव्हर्स सर्चच्या साहाय्याने शोधल्या असता दैनिक भास्करच्या वेबसाईटवर घटनेविषयीची बातमी बघायला मिळाली. साधारणतः तीन महिन्यांपूर्वी प्रसिद्ध बातमीनुसार घटना उत्तर प्रदेशातील मिर्जापूर येथीलच आहे.

viral video of muslim man beating ladies is of mirzapur DB news
Source: Dainik Bhaskar

बातमीनुसार घटना कटरा कोतवाली भागातील उशी दानू शाह वस्तीतील आहे. व्हिडिओमध्ये ज्या महिलेवर हल्ला केला जात असल्याचे बघायला मिळतेय, ती मुस्लिम धर्मीय असून तिचे नाव नसरीन बेगम आहे. तिच्यावर आणि तिच्या दोन मुलींवर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता.

नसरीनच्या घराचे बांधकाम प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सुरु होते. त्यावेळी ती एका मदरशामध्ये आश्रायास होती. या दरम्यानच तिथे राहत असलेल्या एका महिलेशी नसरीनचा वाद झाला आणि त्यातूनच झालेल्या हल्ल्यामध्ये नसरीन आणि तिच्या मुली जखमी झाल्या. आरोपींवर कटरा कोतवालीमध्ये गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती अतिरिक्त एसपी संजय कुमार वर्मा यांनी दिली होती.

मिर्जापूर पोलिसांनी देखील व्हायरल व्हिडीओच्या संदर्भात स्पष्टीकरण देण्यात आले आहे. यात मिर्जापूर पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे की पीडित आणि आरोपी दोन्हीही पक्ष मुस्लिम समाजातील आहेत. सोशल मीडियावर चुकीचे ट्विट करून अफवा पसरविणाऱ्यांचा पोलिसांकडून शोध घेतला असून त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे देखील पोलिसांनी सांगितले आहे.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ चुकीच्या दाव्यांसह शेअर केला जातोय. व्हायरल व्हिडिओतील मारामारीच्या घटनेतील पीडित आणि आरोपी दोन्हीही मुस्लिम समुदायातील आहेत. खुद्द मिर्जापूर पोलिसांनी याविषयी स्पष्टीकरण दिलेले आहे.

हेही वाचा- मुस्लीम पित्याने स्वतःच्या मुलीशी आणि आईने मुलाशी लग्न केल्याचे व्हायरल दावे फेक!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता) 

More from राजकारणMore posts in राजकारण »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा