Press "Enter" to skip to content

जहांगीरपुरी मधील मुस्लिम समुदायातील व्यक्तीने थेट पोलिस अधिकाऱ्याला धमकावले?

दिल्लीतील जहांगीरपुरी येथील हिंसेच्या संदर्भाने एक व्हिडीओ शेअर केला जातोय. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती एका पोलीस अधिकाऱ्याला धमकावत असल्याचे बघायला मिळतेय. ही व्यक्ती पोलीस पोलीस अधिकाऱ्याला उद्देश्यून ‘हिम्मत असेल तर पोलिसांचा गणवेश अंगावर नसताना बाहेर भेट’ अशी धमकी देत असल्याचे दिसून येतेय. हा व्हिडीओ दिल्लीतील जहांगीरपुरी येथील असल्याचे सांगण्यात येतेय.

Advertisement

सुदर्शन न्यूजचे पत्रकार संतोष चौहान यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केलाय.

अर्काइव्ह

फेसबुकवर देखील हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

Muslim man arguing with police fb claims
Source: Facebook

पडताळणी:

व्हायरल व्हिडिओच्या किफ्रेम्स रिव्हर्स सर्चच्या साहाय्याने शोधल्या असता आम्हाला ‘सुदर्शन टीव्ही’च्या ट्विटर हँडलवरून साधारणतः वर्षभरापूर्वी हा व्हिडीओ ट्विट करण्यात आला असल्याचे बघायला मिळाले. सध्या व्हायरल होत असलेली 30 सेकंदाची क्लिप याच व्हिडिओचा भाग आहे.

सुदर्शन टीव्हीच्या अकाऊंटवरून करण्यात आलेल्या या व्हिडिओमधील सुरुवातीचा संवाद मराठी भाषेत आहे. या ट्विटमध्ये महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांना टॅग करण्यात आलेले आहे. शिवाय व्हिडिओमध्ये दिसणारे बोर्ड मराठी भाषेत आहेत. यावरून व्हिडीओ दिल्लीतला नसून महाराष्ट्रातला असल्याचे तसेच तो सध्याचा नसून जुना असल्याचे स्पष्ट झाले.

रिव्हर्स सर्च दरम्यान हाच व्हिडीओ 2018 मध्ये सोपान जाधव या फेसबुक युजरकडून शेअर करण्यात आला असल्याचे देखील बघायला मिळाले. या पोस्टमध्ये सदर व्हिडीओ जळगाव जिल्ह्यातील चोपडा बस स्टॅन्डवरील घटनेचा असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Muslim man arguing with police jalgaon incidence
Source: Facebook

चोपडा पोलीस स्टेशनच्या संदीप पाटील यांनी न्यूजचेकरशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार व्हायरल व्हिडीओ चोपडा बस स्थानकातील घटनेचा आहे. व्हिडिओत ज्या पोलीस अधिकाऱ्याला धमकावले जात असल्याचे बघायला मिळतेय, त्यांचे नाव श्रीकांत गांगुर्डे आहे.

खुद्द श्रीकांत गांगुर्डे यांनी दिलेल्या माहितीनुसार व्हिडीओ सप्टेंबर २०१८ सालचा आहे. बसस्थानकाच्या बाहेर गाडी लावण्यावरून वाद निर्माण झाला होता. याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या चौघांपैकी दोघांचा वर्षभरापूर्वीच मृत्यू झाला आहे. व्हिडिओमध्ये धमकी देताना देणारी व्यक्ती ह्यात नाही.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओचा दिल्लीतील जहांगीरपुरी येथील हिंसाचाराच्या घटनेशी काहीही संबंध नाही. साधारणतः अडीच वर्षांपूर्वीचा हा व्हिडीओ जळगाव जिल्हयातील चोपडा येथील घटनेचा असून व्हिडिओमध्ये पोलीस अधिकाऱ्याला धमकी देणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे.

हेही वाचा- नेवाशात रामनवमीच्या मिरवणुकी दरम्यान मुस्लिमांनी ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा दिल्या?

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »
More from समाजकारणMore posts in समाजकारण »

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा