Press "Enter" to skip to content

रस्त्यावरून डांबराचा थरच सरकल्याचे दृश्य नेमके कुठले? वाचा सत्य!

तुटले-फुटलेले रस्ते काही आपल्याला नवीन नाहीत, मात्र सध्या सोशल मीडियावर एक असा फोटो व्हायरल होतोय, ज्यामध्ये एक डांबरी रस्ता अगदी जमिनीपासूनच वेगळा झालेला बघायला मिळतोय. हा फोटो शेअर करून अशा प्रकारच्या अद्भुत रस्त्यांच्या निर्मितीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना धन्यवाद देऊन उपरोधिकपणे केंद्र सरकारवर टीका केली जात असल्याचे बघायला मिळतेय. हेच खरे ‘अच्छे दिन’ असल्याचे सांगितले जातेय.

Advertisement

अर्काइव्ह

पडताळणी:

सोशल मीडियावरील व्हायरल फोटो नेमका कुठला आहे हे शोधण्यासाठी आम्ही रिव्हर्स सर्चची मदत घेतली. आम्हाला थायलंडमधील थाई पीबीएस न्यूजच्या वेबसाईटवर 1 सप्टेंबर 2019 रोजी प्रसिद्ध बातमीमध्ये हा फोटो बघायला मिळाला. बातमीनुसार हा फोटो थायलंडमधील अमनत चारोएन प्रांतातील चानुमान जिल्ह्यातील बॅन हुआई थॉम-ना नॉन्ग डाएंग रस्त्याचा आहे.

बातमीमध्ये एका फेसबुक युजरची 31 ऑगस्ट 2019 रोजीची पोस्ट देखील बघायला मिळतेय. या पोस्टमध्ये त्याने या रोडचे इतरही काही फोटोज अपलोड केले आहेत. हा आपल्या घराजवळचा रस्ता असल्याचे त्याने सांगितले आहे. या फेसबुक पोस्टनंतर तुटल्या-फुटलेल्या या रस्त्याचे फोटोज थायलंडमध्ये व्हायरल झाले होते.

เหตุการณ์ครั้งนี้ทำให้รู้ว่า ถนนแถวบ้านผมนี่ได้มาตรฐานขนาดไหน👍👍👍👍👍#ค_คนสร้างภาพ

Posted by เจ้าชาย แห่งสายธาร on Friday, 30 August 2019

थायलंडमधील इतरही वेबसाईटवर या फोटो संदर्भातील बातम्या बघायला मिळाल्या.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावरील व्हायरल फोटो भारतातील नसून थायलंडमधील रस्त्याचा आहे. शिवाय फोटो सध्याचा नसून 2019 मधील आहे.

हेही वाचा- ‘तो’ व्हायरल फोटो एकनाथ शिंदे यांचा नाही, अजित पवार यांनी फोन करून केली खात्री!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)

More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा