Press "Enter" to skip to content

इस्कॉनचे स्वयंसेवक युक्रेनमधील लोकांना मदत करत असल्याच्या दाव्यासाठी शेअर केले जाताहेत जुने फोटो!

युक्रेनमधील युद्धजन्य परिस्थिती निवळताना दिसत नाही. रशियन सैन्याकडून युक्रेनवरील हल्ला मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आला आहे. खार्कीव शहरातील भारतीयांना शहर सोडण्यासाठी शेवटच्या काही तासांचे अल्टिमेटम देण्यात आले आहे. दरम्यान, युक्रेनमधील भारतीयांना देशात परत आणण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात येताहेत.

Advertisement

सध्या सोशल मीडियावर काही फोटोज व्हायरल होताहेत. या व्हायरल फोटोंसोबत दावा केला जातोय की हे फोटोज युक्रेनमधील तणावग्रस्त परिस्थितीत तेथील लोकांना मदत करणाऱ्या इस्कॉनच्या स्वयंसेवकांचे आहेत. युक्रेनमधील युद्धजन्य परिस्थितीत इस्कॉनमधील मंदिरातून मदत पुरविली जात आहे.

अर्काइव्ह

फेसबुकवर देखील अशाच प्रकारचे दावे केले जाताहेत.

Iskon volunteers helping indian students in Ukraine fb posts
Source: Facebook

पडताळणी:

व्हायरल फोटो रिव्हर्स सर्चच्या मदतीने शोधला असता आम्हाला 3 जून 2019 रोजी अपडेट करण्यात आलेल्या ब्लॉगमध्ये हा फोटो बघायला मिळाला. म्हणजेच सदर फोटो सध्याचा नाही हे इथेच स्पष्ट झाले. फोटोच्या युआरएलनुसार हा फोटो 2015 मध्ये अपलोड करण्यात आला आहे.

Iskon food distribution 2015

इस्कॉनकडून देखील व्हायरल फोटोंसोबत केल्या जात असलेल्या दाव्यांचे खंडन करण्यात आले आहे. सध्याच्या परिस्थितीत युक्रेनमधील मंदिरांमध्ये निवास किंवा अन्न वितरण करण्यास सक्षम नसल्याचे सांगण्यात आले आहे. अर्थात अडचणीतील सर्वांसाठी इस्कॉनची मंदिरे खुली असल्याचे देखील इस्कॉनकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, इस्कॉनमार्फत युक्रेनमधून हंगरीमध्ये येणाऱ्या निर्वासितांसाठी मदतकार्य सुरु करण्यात आले आहे. इस्कॉनच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून त्याची माहिती देण्यात आली आहे.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावरील व्हायरल फोटोज इस्कॉनच्या स्वयंसेवकांचेच आहेत, पण ते सध्याचे नसून 2015 मधील आहेत. शिवाय सध्याच्या परिस्थितीत युक्रेनमध्ये मदतकार्य चालविण्यास असमर्थ असल्याचे इस्कॉनकडून देखील स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा- त्या चिमुरडीच्या धाडसाचे कौतुकच! पण ना ती चिमुरडी युक्रेनिअन, ना तो सैनिक रशियन!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती ‘चेकपोस्ट मराठी’च्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता) 

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा