पंतप्रधान मोदी यांनी नुकताच मोरांसोबतचा एक व्हिडिओ त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर शेअर केला होता. त्यानंतर सोशल मिडीयामध्ये त्यांचे बदकांसोबतचे (modi with ducks) फोटोज सुद्धा दिसू लागले. या दोन्ही फोटोजवरून विरोधक त्यांच्यावर धारदार टीका करत आहेत.
काँग्रेसने देखील त्यांच्या अधिकृत ट्विटवर अकाऊंटवरून मोदी हातात कॅमेरा घेऊन बदकाचा फोटो काढत असल्याचा फोटो पोस्ट केलाय. महामारीमूळे जगात सर्वाधिक नुकसान झालेल्या देशांपैकी एक असलेल्या आणि आर्थिक मंदीचा सामना करणाऱ्या देशाचा नेता लोकांना मदत न करता प्रसिद्धीचे व्हिडिओ बनवत असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. याच दाव्यासाह हा फोटो सोशल मीडियावरवर व्हायरल होतोय.
हाच फोटो फेसबुकवर देखील फिरवण्यात येतोय. नरेंद्र मोदी ‘पंतप्रधान’पदाच्या प्रतिष्ठेचा विचार न करता प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी पब्लिसिटी स्टंट करत असल्याचा आरोप केला जातोय.
पडताळणी:
‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल फोटो गुगलवर रिव्हर्स इमेज सर्चच्या मदतीने शोधला तेव्हा काही वेगळेच सत्य समोर आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘संडे गार्डीयन’चे संपादकीय संचालक प्रो. माधव नलापत यांनी घेतलेल्या मुलाखतीची एक लिंक मिळाली. काँग्रेसद्वारे व्हायरल करण्यात आलेल्या फोटोंसह यासारखे आणखी काही फोटो आम्हांला नलापत यांच्या ब्लॉगवर मिळाले.
नलापत यांनी ८ जानेवारी २०१२ रोजी ही मुलाखत त्यांच्या ब्लॉगवर शेअर केली होती. २०१२ मध्ये पंतप्रधान मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते.
वस्तुस्थिती:
काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधण्यासाठी शेअर केलेला फोटो (modi with ducks) आताचा नसून २०१२ सालचा असल्याचे ‘चेकपोस्ट मराठी‘ने केलेल्या पडताळणीत स्पष्ट झाले.
आता एवढ्यात नरेंद्र मोदी यांनी बदकांसोबत नव्हे तर मोरांसोबत फोटोशूट केले आहे. त्यांनी स्वतः यासंबंधीचा व्हिडीओ ट्विट केलाय.
हेही वाचा: कॉंग्रेस नेत्यांनी स्वतःचेच सरकार असलेल्या राज्यातला व्हिडीओ खपवला केजरीवालांच्या नावे!
[…] […]