Press "Enter" to skip to content

कानपूर कसोटीसाठी आलेल्या न्यूझीलंडच्या खेळाडूंचे भगवे उपरणे घालून स्वागत करण्यात आले?

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात कानपूर येथे पहिला कसोटी सामना खेळवला जात आहे. दरम्यान, सोशल मीडियावर न्यूझीलंडच्या खेळाडूंचा एक फोटो व्हायरल होतोय. फोटोमध्ये न्यूझीलंडच्या खेळाडूंच्या गळ्यात भगवे उपरणे बघायला मिळतेय.

सोशल मीडियावर दावा केला जातोय की हा फोटो सध्याच्या कानपुर कसोटीसाठी आलेल्या न्यूझीलंडच्या संघाच्या स्वागताचा आहे.

Advertisement

अर्काइव्ह

‘दै. सामना’च्या वेबसाईटवर देखील याच फोटोसह बातमी प्रकाशित करण्यात आली आहे. कानपूरला पोहोचल्यावर दोन्ही संघांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी दोन्ही हिंदुस्थान-न्यूझीलंड संघाचे भगव्या रंगाचा गमछा घालत स्वागत करण्यात आले, असे या बातमीत सांगण्यात आले आहे.

Source: Samna

पडताळणी:

व्हायरल फोटो रिव्हर्स सर्चच्या मदतीने शोधला असता ‘इंडिया टीव्ही’च्या वेबसाईटवर 27 ऑक्टोबर 2017 रोजी प्रसिद्ध बातमी मिळाली.

source: India TV

बातमीनुसार फोटो 2017 मधील भारत-न्यूझीलंड वन-डे सिरीज दरम्यानचा आहे. तीन सामन्यांच्या या सिरीजमधील तिसऱ्या आणि शेवटच्या वनडेसाठी दोन्ही संघ कानपूरला पोहोचले होते. तेथे हॉटेल लँडमार्ककडून सर्व खेळाडूंचे भगव्या रंगाचे उपरणे देऊन स्वागत करण्यात आले होते. उपरण्यावर योगी असेही लिहिलेले होते.

‘इंडिया टीव्ही’च्या युट्युब चॅनेलवर देखील यासंदर्भातील बातमी उपलब्ध आहे.

पडताळणी दरम्यान आम्हाला ANI वृत्तसंस्थेचे एक ट्विट देखील मिळाले. या ट्विटमध्ये कानपुर कसोटीसाठी आलेल्या न्यूझीलंड संघाच्या स्वागताचे फोटोज आहेत. फोटोमध्ये एखाद-दुसऱ्या खेळाडूच्या गळयात भगवे उपरणे बघायला मिळतेय. पण हे फोटोज सध्या व्हायरल होत असलेल्या फोटोपेक्षा वेगळे आहेत.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावरील व्हायरल फोटोज दिशाभूल करणारे आहेत. व्हायरल फोटोज सध्याच्या कानपुर कसोटीसाठी आलेल्या न्यूझीलंड संघाच्या स्वागताचे नसून 2017 मध्ये वन-डे सिरीजसाठी आलेल्या न्यूझीलंड संघाच्या स्वागताचे आहेत.

हेही वाचा- ठाकरे सरकारच्या काळात मुंबई पोलिसांनी गाडीवर भगवा ध्वज फडकवायला बंदी घातलीय?

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)

More from राजकारणMore posts in राजकारण »
More from लाइफस्टाइलMore posts in लाइफस्टाइल »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा