Press "Enter" to skip to content

भाजप नेत्याची आपल्याच मुलीवर बलात्काराची ११ वर्षांपूर्वीची बातमी ताजी म्हणून व्हायरल!

काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि पक्षाचे प्रवक्ते भाई जगताप यांनी ट्विटरवर एका बातमीचा व्हिडीओ शेअर केलाय. भाजप नेता अशोक तनेजा याला आपल्या मुलीवर ८ वर्षापर्यंत बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक (ashok taneja arrested) करण्यात आल्याची ही बातमी आहे.

Advertisement

या निमित्ताने केंद्र सरकारच्या ‘बेटी बचाओ बेटी पढ़ाओ’ योजनेवर टीकास्त्र सोडण्यात येतंय. एकीकडे भाजप ‘बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ’चा नारा देत असताना भाजपच्या नेत्यांपासूनच लेकींना वाचविण्याची वेळ आल्याचं सांगितलं जातंय.

अर्काइव्ह पोस्ट

ट्विटरवर इतरही अनेक युजर्स हाच दावा शेअर करत असल्याचे आपण बघू शकता.

पडताळणी:

प्रकरणाची शहानिशा करण्यासाठी आम्ही ashok taneja arrested किवर्डसह गुगल सर्च केलं, त्यावेळी सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ आम्हाला एनडीटीव्हीच्या वेबसाईटवर मिळाला.

एनडीटीव्हीच्या वेबसाईटवर २६ मार्च २००९ रोजी ही बातमी देण्यात आली होती. त्यावेळी केंद्रात मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार सत्तेत होते.

एनडीटीव्हीच्याच युट्यूब चॅनेलवर देखील ही बातमी बघायला मिळू शकते.

‘इंडिया टूडे’च्या वेबसाईटवर या घटनेविषयी सविस्तर बातमी वाचायला मिळाली. त्यानुसार घटना पंजाबमधील अमृतसरजवळील अंजाला येथील आहे. या प्रकरणी भाजपचा स्थानिक नेता अशोक तनेजा याला अटक करण्यात आली होती. तनेजा हा भाजपच्या अंजाला युनिटचा महासचिव होता.

तनेजा हा आठ वर्षांपासून आपलं लैंगिक शोषण तसेच बलात्कार करत असल्याचा आरोप ठेवत त्याच्या मुलीने त्याच्या विरोधात पोलीस तक्रार नोंदविली होती. काही दिवसांपूर्वी मुंबईत अशाच प्रकारच्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी एका व्यावसायिकाला आपल्या मुलीवर ९ वर्षे बलात्कार केल्याच्या प्रकरणी अटक केली होती. यासंदर्भातील बातमी टीव्हीवर बघितल्यानंतर तनेजाच्या मुलीला पोलिसांमध्ये तक्रार करण्याचे धैर्य मिळाल्याचे देखील रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे.

पडताळणी दरम्यान हा दावा यापूर्वी देखील अनेक वेळा व्हायरल झाला असल्याचे आमच्या लक्षात आले आहे.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ २००९ मधील आहे. म्हणजेच ज्या प्रकरणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला लक्ष्य केले जात आहे, ते ११ वर्षे जुने असून त्यावेळी केंद्रात भाजपचे नव्हे तर काँग्रेसचे सरकार होते.

हे ही वाचा- राज ठाकरेंनी कंगनाची बाजू घेत संजय राऊतांना धमकावले नाही, ते ट्विटर हँडल फेक!

More from राजकारणMore posts in राजकारण »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा