Press "Enter" to skip to content

‘ती’ निरागस चिमुरडी शहीद संतोष बाबू यांची मुलगी नाही !

भारत-चीन सीमेवरील तणावात कर्नल संतोष बाबू यांच्यासह भारताचे २० सैनिक शहीद झाले. १९७५ नंतर पहिल्यांदाच भारतमातेच्या वीर सुपुत्रांना चीनच्या सीमेवर वीरगती प्राप्त झाली.

देशाच्या या वीरांना श्रद्धांजली वाहताना अनेक जण भावूक झाले आहेत. याच भावनिक विवषतेतून सध्या सोशल मिडीयावर एक फोटो खूप व्हायरल होतोय.

फोटोत शहीद कर्नल संतोष बाबू यांच्या फोटोसमोर हात जोडून उभी राहिलेली एक चिमुरडी दिसतेय. सोशल मिडीयावर दावा केला जातोय की ती चिमुरडी कर्नल संतोष बाबू यांची मुलगी आहे.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण राज्यमंत्र्यांचे माध्यम सल्लागार अमर प्रसाद रेड्डी यांनी हा फोटो शेअर केलाय.

“कर्नल संतोष बाबूंच्या मुलीचा हा हृदयद्रावक फोटो म्हणजे सीमेवरील संघर्षाची किंमत आहे. चीनला ती चुकवावी लागेल.” असं रेड्डी यांनी कॅप्शनमध्ये लिहिलंय. ही पोस्ट २४८ लोकांनी रिट्वीट केलीये.

Advertisement

आयएएस अधिकारी सोनल गोयल यांनी देखील हाच फोटो शेअर केलाय.

“कर्नल शहीद संतोष बाबूंची चिमुरडी मुलगी आपल्या वडलांच्या सर्वोच्च बलिदानाला श्रद्धांजली वाहताना. शूर-वीर शहिदांना सलाम” असं गोयल यांनी कॅप्शनमध्ये म्हंटलंय. ही पोस्ट देखील २३० युजर्सनी रिट्वीट केलीये.

अरुणाचल प्रदेशचे डीआयजी आयपीएस मधुर शर्मा यांच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आलेला फोटो देखील ३२९ युजर्सनी रिट्वीट केलाय.

सोशल मिडीयावरच्या याच दाव्यांच्या आधारे ‘पत्रिका’ तसेच ‘झी हिंदुस्थान’ने ही बातमी देखील चालवली.

Zee Hindustan news claiming girl is daughter of Shahid Santosh Babu
Source: Zee Hindustan

पडताळणी

व्हायरल होत चाललेल्या दाव्याची सत्यता पडताळून पाहण्यासाठी आम्ही संशोधन सुरु केलं त्यावेळी आम्हाला ‘एबिव्हीपी कर्नाटक’च्या ट्वीटर हँडलवरून करण्यात आलेलं एक ट्वीट मिळालं.

या ट्वीटमध्ये ‘एबिव्हीपी कर्नाटक’ त्याच हँडलवरून करण्यात आलेलं पूर्वीचं ट्वीट रिट्वीट केलंय आणि कॅप्शनमध्ये रिट्वीट करण्यामागचं स्पष्टीकरण दिलंय.

‘एबिव्हीपी कर्नाटक’ने ट्वीटमध्ये म्हंटलंय,

“कृपया लक्षात घ्या की फोटोमध्ये असणाऱ्या मुलीचं नाव मनश्री आहे. कर्नाटकमधील नीलामंगला तालुक्यात ‘एबिव्हीपी’ मार्फत कर्नल संतोष बाबूंना श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी आयोजित सभेतील हा फोटो आहे.”

त्यानंतर ‘एबिव्हीपी’च्या अधिकृत हँडलवरून देखील यासंदर्भात स्पष्टीकरण देणारं ट्वीट करण्यात आलं. या ट्वीट ‘एबिव्हीपी’ने म्हंटलंय,

“असं निदर्शनास येतंय की काही प्रतिष्ठीत हँडलवरून कुठल्याही चुकीच्या हेतूंशिवाय केवळ चुकीने फोटोमध्ये दिसणारी मुलगी शहीद कर्नल संतोष बाबू यांची मुलगी असल्याचं म्हंटलं गेलंय.

आम्ही सर्वांच्या भावना समजू शकतो परंतु हे स्पष्ट करणे आवश्यक आहे की फोटोतली ती चिमुरडी मुलगी  ‘एबिव्हीपी’ कार्यकर्त्याची लहान बहिण आहे”

वस्तुस्थिती

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झालं की फोटोमध्ये दिसणारी त्या चिमुरडीचं नाव मनश्री आहे. ती शहीद संतोष बाबूंची मुलगी नसून ‘एबिव्हीपी’ कार्यकर्त्याची लहान बहिण आहे.

व्हायरल होत असलेला फोटो कर्नाटकमधील नीलामंगला तालुक्यात ‘एबिव्हीपी’कडून कर्नल शहीद संतोष बाबूंना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या श्रद्धांजली सभेतील आहे.

हेही वाचा: भारतीय सैन्यातले ५० जवान मारले गेले आणि ७५ बंदी बनवले सांगणारा स्क्रिनशॉट फेक!

More from समाजकारणMore posts in समाजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा