Press "Enter" to skip to content

पॅरिसमध्ये हत्या झालेल्या शिक्षकाकडून विस्थापितांच्या स्वागताचा दावा करत भाजप नेत्याची फेक पोस्ट!

साधारणतः आठवडाभरापूर्वी पॅरिसमध्ये प्रेषित मोहोम्मद पैगंबर यांचे कार्टून दाखविल्यामुळे एका शिक्षकाची गळा चिरून हत्या करण्यात आली. त्यानंतर आता सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होतोय. दावा करण्यात येतोय की फोटोत दिसणारी व्यक्ती हत्या करण्यात आलेले शिक्षक सैम्युअल पेटी (samuel patty) असून ते काही वर्षांपूर्वी निर्वासितांचे स्वागत करत होते आणि त्या निर्वासितांपैकीच एकाने त्यांचा जीव घेतला.

Advertisement

भाजपचे सदस्य मेजर सुरेंद्र पुनिया यांनी आपल्या व्हेरीफाईड ट्विटर अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला आहे. फोटोच्या कॅप्शनमध्ये मेजर पुनिया लिहितात, “फ़ोटो में जो बीच में खड़ा है वो वही टीचर है जिसका एक जिहादी ने पेरिस में सर काट दिया था…कुछ साल पहले वो फ़्रांस में आने वाले Refugees का स्वागत कर रहा था पर उसे क्या पता था कि वो refugee उसी का गला काट देंगे. ये उन लिबरांडुओं के लिये है जो भारत में रोहिंग्या को बसाना चाहते हैं.” या ट्विटला बातमी करेपर्यंत जवळपास ४३०० लोकांनी रीट्विट केले होते.

अर्काइव्ह पोस्ट

मेजर पुनिया यांनी फेसबुकवर देखील अशीच पोस्ट टाकली आहे तिलाही बातमी करेपर्यंत जवळपास ७३८ शेअर्स होते. विस्थापित रोहिंग्या मुसलमानांना भारतात आश्रय देण्यात यावा अशा मताच्या लोकांना या माध्यमातून लक्ष्य बनवलं जातंय.

Major Punia shared Samuel Paty's post on facebook checkpost marathi
Source: Facebook

पडताळणी :

मेजर पुनिया यांनी दावा केलाय की हा फोटो काही वर्षांपूर्वीचा आहे. परंतु थोडंस लक्ष देऊन बघितलं तर आपल्या लक्षात येईल की फोटोत दिसणाऱ्या तिन्हीही व्यक्तींच्या चेहऱ्यावर मास्क आहे. म्हणजेच हा फोटो काही वर्षांपूर्वीचा नसून कोरोनाकाळातला म्हणजेच सध्याचा आहे.

फोटो नेमका कुठला आहे, हे पडताळण्यासाठी आम्ही तो रिव्हर्स सर्चच्या मदतीने शोधला. आम्हाला गुड चान्स नावाच्या ट्विटर हॅण्डलवरून १७ ऑक्टोबर २०२० रोजी हा फोटो पोस्ट केला गेला असल्याचे आढळून आले. ट्विटच्या कॅप्शननुसार हा फोटो फ्रान्समधील नसून इंग्लडमधील फॉक्सटोन येथील असल्याचे स्पष्ट झाले.

त्यानंतर आम्ही पॅरिसमध्ये निर्घृणपणे हत्या करण्यात आलेले शिक्षक सैम्युअल पेटी यांच्या ‘द इकॉनॉमिस्ट’च्या बातमीतील फोटोशी (samuel patty) व्हायरल फोटोतील व्यक्तीच्या फोटोची तुलना केली. त्यावेळी दोघांच्या फोटो मध्ये कसलेही साम्य नसल्याचे आम्हाला आढळून आले.

Samuel Paty vs Viral pic checkpost marathi
Source: Twitter/ The Economist

वस्तुस्थिती :

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावर सैम्युअल पेटी यांचा म्हणून व्हायरल करण्यात येत असलेला फोटो त्यांचा नाही. हा फोटो पॅरिस किंवा फ्रान्समधील देखील नसून इंग्लडमधील आहे.

सैम्युअल पेटी यांच्या निमित्ताने विस्थापितांवर आणि रोहिंग्या मुसलमानांना लक्ष्य करण्याच्या उद्देशाने सैम्युअल पेटी यांचा म्हणून दुसऱ्याच व्यक्तीचा फोटो शेअर केला जातोय.

हे ही वाचा- कलम ३७० हटवल्यानंतर काश्मिरात काय बदललं हे सांगणारी तरुणी नेमकी आहे तरी कोण?

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »
More from राजकारणMore posts in राजकारण »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा