कॉंग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी भारताची संपत्ती लुटून इटलीमध्ये अरबो रुपये किमतीची भव्य इमारत खरेदी केली (rahul gandhi italy house) असल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
‘‘में इटली से एक हिंदुस्तानी बोल रहा हूं यह राहुल गांधी की बिल्डिंग है जो करोड़ों की नहीं बल्कि अरबों रुपए की है भारत से लुट कर के इटली में इतनी संपत्ति बना रखी है पप्पू गांधी ने और मां सोनिया गांधी ने मित्रों आप इस बिल्डिंग को देखेंगे तो आपकी आंखें चक्कर खा जाएगी।‘ या अशा कॅप्शनसह तो व्हिडीओ शेअर केला जातोय.
ही इमारत म्हणजे राहुल गांधी यांचे इटलीतील आलिशान घर (rahul gandhi italy house) असल्याचा दावा देखील सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर करताना अनेकांकडून करण्यात येतोय. हा व्हिडीओ फेसबुकवर मोठ्या प्रमाणात शेअर झाला आहे. ट्विटरवर देखील हीच परिस्थिती आहे आणि अर्थातच व्हॉट्सऍपसुद्धा यास अपवाद नाही.
‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक एम. एस. घाटे यांनी व्हॉट्सऍपवरील व्हायरल दाव्यांविषयी माहिती देत पडताळणीची विनंती केली.
पडताळणी:
‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल व्हिडीओच्या की-फ्रेम्स रिव्हर्स ईमेज सर्च करून पाहिल्या असता व्हिडीओत दिसणारी इमारत इटलीमधील तुरीन भागातील ‘पियाझा कॅसेलो’ असल्याचे समजले. यास ‘कॅसल स्क्वेअर’ असेही म्हणतात.
या इमारतीविषयी अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता ‘ईटली व्हिलाज‘ या पर्यटन संकेतस्थळावर असे समजले की हा इमारतींचा समूह आहे. यामध्ये पलाझो मदामा, ओपेरा हाउस, रॉयल लायब्ररी आणि टोरे लीत्तोरीया अशा इमारतींचा यात समावेश आहे.
यातील मुख्य इमारत म्हणजे ‘रॉयल पॅलेस ऑफ तुरीन‘ चौदाव्या शतकात सेव्होय वंशाच्या राजकन्येने बांधून घेतली आहे. १९५५ साली ही इमारत शासनाच्या अखत्यारीत गेली. आता तिथे ‘रॉयल म्युझियम’ म्हणजे वस्तू संग्रहालय आहे. या इमारतीस १९९७ मध्ये युनेस्कोने वर्ल्ड हेरीटेजचा दर्जा दिलाय.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये व्हायरल व्हिडीओतील दावा निखालस खोटा असल्याचे स्पष्ट झाले. व्हिडीओमध्ये दिसत असलेली इमारत राहुल गांधी यांनी विकत घेतलेली नाही.
तो ‘रॉयल पॅलेस ऑफ तुरीन’ असून सध्या ईटली पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत आहे.
हेही वाचा: राहुल गांधी यांच्यावर विरोधकांनी आजवर डागलेल्या ‘फेक’ तोफा !
Be First to Comment